Pro Kabaddi League : कबड्डीचा रोमांच! आज दोन सामने; जाणून घ्या कोण कुणाशी भिडणार...
Pro Kabaddi League 2021 : प्रो कबड्डी लीगमध्ये पहिला सामना यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्समध्ये रंगणार आहे तर दुसरा सामना हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटन यांच्यात खेळला जाणार आहे.
Pro Kabaddi 2019: भारतातील लोकप्रिय लीग पीकेएलला (Pro Kabaddi League 2021) काल 22 डिसेंबरपासून सुरुवात झाली. (VIVO Pro Kabaddi U Mumba vs Jaipur Pink Panthers Puneri Paltan vs Haryana Steelers) प्रो कबड्डी लीगचा रोमांच सुरु झाला असून आज महत्वाचे दोन सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्समध्ये रंगणार आहे तर दुसरा सामना हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटन यांच्यात खेळला जाणार आहे.
मुंबईनं पहिल्या सामन्यात तेलुगू टायटंसला हरवलं आहे तर जयपूरचा आजचा पहिलाच सामना आहे. जयपूर पॅंथर्सचा डिफेंस अनुभवी दिसून येत नसल्यानं अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जयपूरकडे दीपक हुड्डा आणि संदीप धुल वगळता एकही तगडा खेळाडू दिसून येत नाहीय. यातही कर्णधार दीपक हुड्डा सांघिक खेळाच्या बळावर सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर पहिला सामना जिंकल्यानं मुंबईचा आत्मविश्वास वाढला आहे.
दुसऱ्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स टीम प्रो कबड्डी लीग (पीकेएल) मधील आपला पहिला सामना गाचीबावली कॉम्पलेक्स स्टेडिअममध्ये पुणेरी पलटनविरोधात खेळणार आहे. मागील हंगामात हरियाणा 42 अंकांसह सहाव्या स्थानावर होता तर पुणे 52 अंकांसह चौथ्या स्थानी होता.
आज पहिला सामना यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्समध्ये सायंकाळी 7: 30 वाजता रंगणार आहे तर दुसरा सामना हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटन यांच्यात रात्री 8.30 वाजता खेळला जाणार आहे.
पीकेएलचे सर्वाधिक किताब पाटणा पायरेट्सनं पटकावले
पीकेएलचे आतापर्यंत सात हंगाम पार पडले आहेत. ज्यात पीकेएलचे सर्वाधिक किताब पाटणा पायरेट्सनं पटकावले आहे. पाटणा पायरेट्सने तीनदा विजेतेपद पटकावले आहेत. या स्पर्धेत पाटणा व्यतिरिक्त कोणत्याही संघाला दोनदा विजतेपद मिळवता आले नाही. जयपूर पिंक पँथर्स, यू मुंबा, बेंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावलंय. पाटणा पायरेट्सनं नुकतीच प्रशांत कुमार राय यांची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केलीय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -