एक्स्प्लोर
वीरुच्या ट्वीटचा धुमाकूळ, बिग बींचीही दाद
मुंबई : टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग आता क्रिकेटच्या मैदानावर नाही तर सोशल मीडियावर तुफान फटकेबाजी करत आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून साक्षी मलिक ही पहिली महिला पैलवान ठरली आहे. साक्षीच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागने शोभा डे यांचा त्याच्या खास शैलीत समाचार घेतला.
शोभा डेंचं ट्वीट
शोभा डे यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची थट्टा उडवली होती. ट्विटरवरुन शोभा डे यांनी भारतीय पथकावर निशाणा साधला होता. भारतीय पथकाचं एकच लक्ष आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या. पैसा आणि संधी वाया घालवा अशा प्रकारचा ट्वीट शोभा डे यांनी केलं होतं. त्यावरुन शोभा डे यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता.
शोभा डेंकडून रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची थट्टा
शोभा डेंबाबतच्या सेहवागच्या ट्वीटचा धुमाकूळ
"साक्षी मलिक के गले में मेडल कितना 'शोभा डे' रहा है ना!!!," असं ट्वीट वीरेंद्र सेहवागच्या फॅन क्लब असलेल्या अकाऊंटवरुन केलं होतं. हे ट्वीट सुमारे 6 हजार वेळा रिट्वीट झालं आहे, तर तब्बल 5200 हून जास्त ट्विपल्सनी हे ट्वीट लाईक केलं आहे. यानंतर वीरेंद्र सेहवान या ट्वीटलाच कोट करुन लिहिलं आहे की, "बिलकुल, इसलिए शोभा ना डे ऐसे काम नहीं करने चाहिए."
https://twitter.com/virendersehwag/status/766180757370986497
माझा कट्टा : शोभा डेंच्या त्या ट्विटबाबत आमीर म्हणतो...
महानायकाचीही वीरुच्या ट्वीटला दाद यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनीही सेहवागच्या ट्वीटला दाद दिली. "हाहाहा... विरु जी... आपका सेन्स ऑफ ह्यूमर ने एक और सिक्सर मार दिया स्टेडियम के बाहर!!", असं बच्चन यांनी सेहवागच्या ट्वीटला कोट करुन लिहिलं आहे. हे ट्वीटही 1600 हून जास्त वेळा रिट्वीट झालं असून साडे तीन हजारांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. https://twitter.com/SrBachchan/status/766184225800347648अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement