एक्स्प्लोर
Advertisement
सहवाग आगामी आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत दिसणार?
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सहवाग आता आयपीएलची टीम किंग्स इलेव्हन पंजाबचा प्रशिक्षक म्हणून लवकरच नवी जबाबदारी पेलताना दिसू शकतो.
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी शुक्रवारी किंग्स इलेव्हनच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना 2014 साली सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली.
मात्र संजय बांगर यांच्या जागी आता सहवागची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 38 वर्षीय सहवाग गेली दोन वर्ष मेंटॉर या नात्याने किंग्स इलेव्हनला मार्गदर्शन करतो होता. त्यामुळे सहवागलाच पूर्णवेळ प्रशिक्षकपदी बढती मिळण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान संघ व्यवस्थापनाकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबने या आयपीएल मोसमासाठी मिशेल जॉन्सन, ऋषी धवन यांसारख्या खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. त्यामुळे संघाची कामगिरी सुधरवण्यासाठी आता व्यवस्थापनाला सहवागकडून मोठ्या अपेक्षा असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement