एक्स्प्लोर
प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा दोन ओळींचा बायोडेटा BCCI ला सादर!

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड होणार आहे. सध्याचा प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आघाडीवर आहे. प्रशिक्षकपदासाठी सेहवागने बीसीसीआयला जो बायोडेटा पाठवला तो केवळ दोन ओळींचा आहे. त्यामुळे बोर्डाने सेहवागकडून संपूर्ण बायोडेटा मागितला आहे.
सेहवागचा बायोडेटा
सेहवागने त्याच्या बायोडेटामध्ये लिहिलं आहे की, "इंडियन प्रीमियर लीगच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मेंटर आणि प्रशिक्षक. या मुलांसोबत (भारतीय खेळाडू) क्रिकेट खेळलो आहे."
सेहवाग खरंच सेहवागच आहे. त्याने केवळ दोन ओळींचा बायोडेटा पाठवला आहे. त्याने सोबत कोणताही सीव्ही जोडलेला नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
यानंतर बोर्डाने त्यांच्याकडून सविस्तर बायोडेटाही जोडायला सांगितला आहे. त्यानंतर सेहवागला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
कशी होणार प्रशिक्षकाची निवड?
25 मे रोजी या पदासाठी अर्ज मागवले होते. इच्छुक उमेदावरांची मुलाखत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची सल्लागार समिती घेईल. त्यानंतर प्रशिक्षकाची नेमणूक केली जाईल.
लंडनमध्ये प्रशिक्षकपदासाठी मुलाखती?
सेहवाग सध्या लंडनमध्ये आहे. एजबॅस्टनमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो कॉमेंट्री करताना दिसला. तीन सदस्यीस सल्लागार समिती लंडनमधून प्रशिक्षकपदासाठी मुलाखत घेईल. सेहवाग स्काईपवरुन मुलाखत देणार असल्याचं कळतं.
या खेळाडूंचेही अर्ज
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासह, सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी, इंग्लिश खेळाडू रिचर्ड पायबस, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि गगन खोडा यांनी अर्ज दाखल केले आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement


















