एक्स्प्लोर

सर्वात यशस्वी गोलंदाज बाहेर, विराटच्या निर्णयावर आश्चर्य

सेन्चुरियन कसोटीत असे काही बदल केले आहेत, ज्यावर दिग्गजांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नवी दिल्ली : केपटाऊनमधील पराभवाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हादरला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, त्याने सेन्चुरियन कसोटीत असे काही बदल केले आहेत, ज्यावर दिग्गजांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवाय सर्वांना आश्चर्याचा धक्काही बसला आहे. ‘करो या मरो’ची परिस्थिती असताना संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजालाच विराट कोहलीने बाहेर बसवलं आहे. भुवनेश्वर कुमारच्या जागी इशांत शर्माला संधी देण्यात आली आहे. केपटाऊन कसोटीत भुवनेश्वर कुमारने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांमध्ये धडकी भरवली होती. त्याने सर्वाधिक 6 विकेट घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. उसळत्या खेळपट्टीवर इशांत शर्मा भुवनेश्वरपेक्षा जास्त फायदेशीर राहिल, असं विराटचं म्हणणं आहे. मात्र उसळते चेंडू टाकण्यामुळे ज्या गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज घाबरत होते, त्यालाच संघातून आऊट केलं आहे. दिग्गजांनीही विराटच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. सेन्चुरियनसारख्या खेळपट्टीवर उसळते चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजापेक्षा स्विंग करणाऱ्या गोलंदाजाचा फायदाच झाला असता, असं लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे. तर भुवीला बाहेर बसवणं हे चुकीचं असल्याचं निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांचं म्हणणं आहे. विराटच्या या निर्णयावर सोशल मीडियातूनही दिग्गजांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. भुवीला बाहेर बसवणं ही मस्करी आहे का, असा सवाल दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड यांनी केला आहे. केवळ भुवनेश्वरच्या बाबतीतच नाही, तर विराटने आणखी काही निर्णय असे घेतले, जे जाणकारांनाही धक्का देणारे आहेत. उपकर्णधार अजिंक्य रहाणेला सलग दुसऱ्या कसोटीतून बाहेर बसवणं, जसप्रीत बुमराकडून नव्या चेंडून गोलंदाजी करणं या निर्णयांवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सेन्चुरियन कसोटीचा निकाल समोर येणं बाकी आहे. दक्षिण आफ्रिकेने केलेली सावध सुरुवात आणि भारतीय गोलंदाजांची लागलेली कसोटी हे बरंच काही सांगत आहे. त्यामुळे विराटचे हे निर्णय किती यशस्वी होतात, ते आता येणारा काळच ठरवणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Embed widget