एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बर्थ डे स्पेशल : गेल्या एका वर्षात कोहलीची 'विराट' कामगिरी
गेल्या वर्षीच्या वाढदिवसापासून या वाढदिवसापर्यंत विराटने अनेक विक्रम नावावर केले आहेत.
राजकोट : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 29 वा वाढदिवस आहे. देशभरात विराटचा वाढदिवस त्याचे चाहते मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करणार हे नक्कीच. पण रात्री 12 वाजता ड्रेसिंग रुममध्ये केक कापून विराटचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
विराटने गेल्या एका वर्षात टीम इंडिया आणि विजय हे समीकरण निश्चित केलं आहे. भारताला पराभवाचा सामना करावा लागला, असं खुप कमी वेळा पाहायला मिळालं. पराभवाचा तिरस्कार करतच विराट ब्रिगेड मैदानात उतरते आणि प्रतिस्पर्धी टीमचा धुव्वा उडवते.
कर्णधार म्हणून दमदार कामगिरी
2017 च्या सुरुवातीला महेंद्र सिंह धोनी टीम इंडियाच्या वन डे कर्णधारपदावरुन पायउतार झाला. त्यानंतर कसोटी कर्णधार असलेल्या विराटकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. विराटने त्याच्या मागच्या वर्षीच्या वाढदिवसापासून आतापर्यंत एकूण चार कसोटी मालिका खेळल्या. या सर्वच्या सर्व कसोटी मालिका भारताने आपल्या खिशात घातल्या.
विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या वाढदिवसापासून आतापर्यंत एकूण 13 कसोटी सामने खेळले. यापैकी 10 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. तर एका कसोटीत पराभव स्वीकारावा लागला आणि दोन सामने अनिर्णित राहिले.
विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने आतापर्यंत 5 वन डे मालिका खेळल्या आहेत. यापैकी सर्वच्या सर्व मालिकांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. विराटच्या नेतृत्त्वात भारताला केवळ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
या वर्षात सर्वाधिक धावा
विराट या वर्षात वन डेमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा एकमेव फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 26 सामन्यांमध्ये 1460 धावा केल्या आहेत. इतर कोणताही फलंदाज त्याच्या आसपासही नाही.
शतकवीरांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर
वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी तो सर्वाधिक वन डे शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर या यादीत विराटचा नंबर लागतो.
वन डेत सर्वाधिक वेगवान 9 हजार धावा
विराटने 194 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या. एवढ्या वेगवान 9 हजार धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सच्या नावावर हा विक्रम होता. डिव्हीलियर्सने 205 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
भारतीय फलंदाजांमध्ये या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुली अव्वल स्थानावर होता. गांगुलीने 228 इनिंगमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तर सचिन तेंडलुकरला 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 235 इनिंग खेळाव्या लागल्या होत्या. या वन डेत 113 धावांची शतकी खेळी करणारा विराट 9 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील 113 वा खेळाडू आहे.
आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल
भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या मालिकेआधी, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. पण अवघ्या दहा दिवसांत डिव्हिलियर्सला पिछाडीवर टाकून, विराट पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाला.
कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 263 धावांचा रतीब घातला. त्यामुळे विराटची एकूण कमाई ही 889 गुणांची झाली असून, सचिननं 1998 साली केलेली सर्वाधिक गुणकमाई ही 887 होती.
पहिल्या दहा जणांमध्ये कोहलीशिवाय एकमेव रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा वन डे रँकिंगमध्ये सातव्या स्थानावर तर महेंद्रसिंह धोनी अकराव्या स्थानी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement