(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs New zealand Semi Final : सचिनच्या घरच्या मैदानावर सचिनचाच पराक्रम मोडित काढण्यासाठी रोहित आणि विराट एकाचवेळी सज्ज! कोण मारणार बाजी?
World Cup 2023 India vs New zealand Semi Final:
World Cup 2023 India vs New zealand Semi Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना उद्या मुंबईत खेळला जाईल. विश्वचषक 2023 च्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. टीम इंडियासाठी विराट कोहलीने 95 धावांची शानदार खेळी केली. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. भारताकडून न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. पहिल्या तीन खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचाही समावेश आहे.
सचिनच्या मैदानावर सचिनचा विक्रम मोडण्याची संधी
दरम्यान, भारताकडून एकाच वर्ल्डकप आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने 2003 वर्ल्डकपमध्ये 673 धावांचा पाऊस पाडला होता. तोच विक्रम आता मोडण्याची संधी एकाचवेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे आहे. कोहलीला अवघ्या 80 धावांची गरज असून रोहितला 171 धावांची गरज आहे. रोहितचा वेग पाहता तो एकाच सामन्यात ही खेळी करू शकतो.
Virat Kohli needs 80 runs.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 14, 2023
Rohit Sharma needs 171 runs.
- To break Sachin Tendulkar's record of most runs in a World Cup edition. pic.twitter.com/eeZSAr9v4c
दरम्यान, या विश्वचषकात विराटने आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. वानखेडे स्टेडियमवर कोहली न्यूझीलंडला हरवू शकतो. भारताकडून न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने 30 सामन्यांमध्ये 1528 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 5 शतके आणि 9 अर्धशतके केली आहेत. या काळात कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 154 आहे.
Rohit Sharma is 3 sixes away from becoming the leading six hitter in the World Cup history.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 14, 2023
- The Hitman is having a memorable tournament...!!! pic.twitter.com/pKHcl0oyHD
सचिन न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा खेळाडू आहे. सचिनने 42 सामन्यात 1750 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 5 शतके आणि 8 अर्धशतके केली आहेत. सचिनची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 186 आहे. वीरेंद्र सेहवाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. सेहवागने 23 सामन्यात 1157 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 6 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. अझरुद्दीनने 40 सामन्यात 1118 धावा केल्या आहेत.
विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलकाता येथे होणार आहे. हा सामना 16 नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या