एक्स्प्लोर
विजय-कोहलीची शतकं, भारताने धावांच्या गंगेत हात धुतले!
हैदराबाद : सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीनं झळकावलेल्या शतकांनी बांगलादेशविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत भारताला पहिल्या दिवसअखेर तीन बाद 356 धावांची मजल मारून दिली.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी कोहली 111 धावांवर, तर अजिंक्य रहाणे 45 धावांवर खेळत होता.
सलामीच्या लोकेश राहुलचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी आज धावांच्या गंगेत आपले हात धुवून घेतले. त्यामुळं भारताच्या डावात मोठ्या भागिदारीही पाहायला मिळाल्या.
मुरली विजयनं 12 चौकार आणि एका षटकारासह 108 धावांची खेळी उभारली. त्याचं हे नववं कसोटी शतक ठरलं. विराट कोहलीनं कारकीर्दीतलं सोळावं कसोटी शतक साजरं केलं. त्याच्या नाबाद 111 धावांच्या खेळीला बारा चौकारांचा साज आहे.
विराट कोहलीने 130 चेंडूत शतक झळकावलं.
मुरली विजयचं शतक
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजयने दणदणीत शतक झळकावलं.
विजयने 149 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकत शतक पूर्ण केलं. विजयचं हे कारकिर्दीतील नववं तर बांगलादेशविरुद्धचं दुसरं शतक आहे. तर त्याचं भारतातील सहावं आणि हैदराबादमधील दुसरं शतक आहे.
विजय 159 चेंडूत 108 धावा करुन माघारी परतला.
या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सलामीवीर के एल राहुलला या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आलं. तो अवघ्या 2 धावा करुन माघारी परतला. टस्किन अहमदने त्याला क्लीन बोल्ड केलं.
राहुल बाद झाला त्यावेळी भारताची स्थिती 1 बाद 2 अशी होती.
त्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला. पुजारा- मुरली विजय जोडीने टिच्चून फलंदाजी करत, धावफलक हालता ठेवला. दोघांनी आपआपली अर्धशतकं पूर्ण केली.
दोघांची शतकाकडे वाटचाल सुरु होती, त्यावेळी मेहदी मिराझच्या गोलंदाजीवर पुजारा बाद झाला. पुजाराने 177 चेंडूत 83 धावा केल्या.
पुजारा- मुरली विजयने दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 178 धावांची भागीदारी रचली.
पुजारा बाद झाल्यानंतर मुरली विजयच्या साथीला विराट कोहली आला. या दोघांनी पुन्हा धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुरली विजयने त्याचं शतक पूर्ण केलं.
शतकानंतर हात खोलण्याच्या तयारीत असलेला विजय तैजुल इस्लामच्या गोलंदाचीवर चकला आणि क्लीन बोल्ड झाला.
त्यानंतर कोहलीने अजिंक्य रहाणेच्या साथीने खेळाची सुत्रे हाती घेतली. रहाणेनेही संयमी फलंदाजी करत कोहलीला उत्तम साथ दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement