एक्स्प्लोर
Advertisement
विराटचं पहिल्याच सामन्यात शतक, गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी
भारताच्या विजयात कर्णधार विराट कोहलीचंही मोठं योगदान होतं. त्याने 119 चेंडूत 112 धावांची खेळी केली.
डर्बन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाने विजयाने सुरुवात केली आहे. कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या टीम इंडियासाठी ही दिलासादायक बाब आहे. भारताच्या विजयात कर्णधार विराट कोहलीचंही मोठं योगदान होतं. त्याने 119 चेंडूत 112 धावांची खेळी केली.
विराटने या शतकासोबतच मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बरोबरी केली. कर्णधार या नात्याने गांगुलीच्या नावावर 146 सामन्यात 11 शतकं आहेत. तर विराटने हा आकडा 44 सामन्यातच गाठला.
कर्णधार या नात्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांच्याही नावावर प्रत्येकी सहा शतकं आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी 270 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची दोन बाद 67 अशी अवस्था झाली होती. पण विराट आणि रहाणेने तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
विराट कोहलीने 118 चेंडूंमध्ये दहा चौकारांसह 112 धावा ठोकल्या. हे त्याच्या कारकीर्दीतलं तेहतीसावं वनडे शतक ठरलं. रबाडाने कोहलीला झेलबाद केल्यानंतर धोनी मैदानात उतरला. अजिंक्य रहाणेने पाच चौकार आणि दोन षटकारांसह 79 धावांची खेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement