एक्स्प्लोर
Advertisement
'माझा किताब तू घे', पराभूत चिनी बॉक्सरला विजेंदरडून ऑफर, चीनला शांती संदेश
भारतीय बॉक्सिंगपटू विजेंदर सिंहनं आज खेळाडूबरोबरच आपण एक सच्चा भारतीय असल्याचं सिद्ध केलं.
मुंबई : भारतीय बॉक्सिंगपटू विजेंदर सिंहनं आज खेळाडूबरोबरच आपण एक सच्चा भारतीय असल्याचं सिद्ध केलं. मुंबईतल्या वरळीतील एनएससीआई इथं विजेंदरचा सामना चीनच्या मायमायतियाली झाला. या सामन्यात विजेंदरनं चांगला खेळ करत मायमायतियाली पराभूतही केलं. मात्र जेव्हा किताब देण्याची वेळ आली त्यावेळी किताबाच्या रुपात देण्यात आलेला बेल्ट विजेंदरनं चीनच्या मायमायतियाली परत देण्याची ऑफर दिली.
भारत आणि चीन यांच्यात शांततेच्या मार्गानं तिढा सुटावा. या भावनेनं आपण हा बेल्ट परत देण्याची ऑफर मायमायतियालीला दिली होती अशी भावना विजेंदरनं पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
विजेंदरनं सलग नववा व्यावसायिक लढत जिंकून आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आणि ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन हे दोन्ही किताब पटाकवले. या विजयानंतर मायमायतियालीनं आपली चीनी पद्धतीची टोपी विजेंदरच्या डोक्यात घातली. त्यानंतर विजेंदरनं भारत-चीन यांच्यातील तिढा शांततेनं सुटावा यासाठी जिंकलेला किताब (बेल्ट) परत करण्याची ऑफर मायमायतियाली दिली. पण भाषेच्या अडचणीमुळे मायमायतियाली विजेंदर काय म्हणाला ते समजलं नाही. तर विजेंदरला फक्त हिंदी आणि इंग्रजीच बोलता येतं. त्यामुळे त्याला आपणं म्हणणं त्याच्यापर्यंत पोहचवता आलं नाही.
दरम्यान, लढतीनंतर पत्रकार परिषदेत दोन्ही बेल्ट हे विजेंदरच्याच बाजूला होते. मात्र, भारत-चीनमधील तिढा शांततेच्या मार्गाने सुटावा अशी इच्छा त्यानं व्यक्त केली.
संबंधित बातम्या :
विजेंदरचा विजयी पंच, चीनच्या मायमायतियालीवर शानदार विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement