एक्स्प्लोर
वेंकटेश प्रसादही टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत
मुंबई: भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादही टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी शर्यतीत उतरला आहे. प्रसादनं याआधी 2007 ते 2009 या कालावधीत भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
सध्या प्रसाद बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीचा अध्यक्ष आहे. त्याआधी प्रसादनं 33 कसोटी आणि 161 वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
प्रसादच्या नावावर कसोटीत 96 आणि वन डेत 196 विकेट्स जमा आहेत. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी प्रसादसोबतच संदीप पाटील आणि रवी शास्त्री या दिग्गजांनीही अर्ज दाखल केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement