एक्स्प्लोर

Virat Kohli : 'अंडही खातो...', म्हणणाऱ्या विगन विराटचे हे शब्द ऐकून क्रीडारसिकांची तीव्र नाराजी

काही क्रिकेटपटू हे तर अनेकांच्या आदर्शस्थानी आहेत. याच खेळाडूंमधील एक नाव म्हणजे, क्रिकेटपटू विराट कोहली याचं.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, सहसा हे त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. मागील काही वर्षांपासून संघात आलेला हा फिटनेसचा ट्रेंड सध्या चांगलाच स्थिरावत आहे. यामध्येच काही क्रिकेटपटू हे तर अनेकांच्या आदर्शस्थानी आहेत. याच खेळाडूंमधील एक नाव म्हणजे, क्रिकेटपटू विराट कोहली याचं. 

अंडर 19 पासून ते आता, संघाचं कर्णधारपद भूषवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विराटनं स्वत:मध्ये परिस्थितीनुरुप महत्त्वाचे बदल केले. शारीरिक सुदृढता, खेळाचं स्वरुप या साऱ्यासोबतच त्यानं खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. मागे एका मुलाखतीदरम्यान, त्यानं आपल्या आहाराच्या सवयींचा उलगडा केला होता, त्यावेळी तो विगन असल्याची बाब समोर आल्याचा अनेकांचाच दावा. 

पण, याच विराटनं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर झालेल्या 'आस्क मी एनिथिंग' सेशनमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत सांगताना अंडही खात असल्याची कबुली दिली. आणि बस्स... मग काय, त्याच्या या एका प्रश्नाच्या उत्तरानं अनेक क्रीडारसिक नाराज झाले. 

डाएटमध्ये नेमकं काय सेवन करतो अशा आशयाच्या प्रश्नाचं उत्तर देताना, आपण खूप साऱ्या भाज्या, काही अंडी, 2 कप कॉफी, क्विनोआ, खूप सारा पालक यांचं सेवन करतो शिवाय डोसाही आवडतो, असं त्याने सांगितलं. पण, या साऱ्याचं प्रमाणशीर सेवन करण्यावरच आपला भर असतो, असंही त्याने न विसरता सांगितलं. 

विराटच्या या उत्तराचा स्क्रीनशॉट काढत अनेक क्रीडारसिकांनी विराटच्या त्या मुलाखतीची आठवण करुन दिली. जिथं केविन पीटरसनसोबतच्या इन्स्टाग्राम चॅटची आठवण करुन दिली. जिथं त्यानं विगन होण्याची कारणं स्पष्ट केली होती. 

Virat Kohli Look | विराट कोहलीचा नवा लूक पाहून चाहत्यांना 'मनी हाईस्ट'मधल्या प्रोफेसरची आठवण

पाठीच्या कण्याचा त्रास असल्यामुळं त्याचे थेट परिणाम एका बोटावर होत असून, फलंदाजी करताना त्यावर याचे परिणाम होतात. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना 2018 मध्ये हा त्रास जाणावला होता. पुढे मला अॅसिडीटीचा त्रास जाणवू लागला, शरीरातील हाडांमध्ये असणारं कॅल्शियम कमी होऊ लागलं, ज्यामुळे पाठीच्या मणक्याचा त्रास जाणवू लागला, त्यामुळे मी मांसाहार बंद केला असं सांगत आपल्याला आता बरं वाटत असल्याचं विराट म्हणाला होता. 

विराटचे हे उदगार आणि त्यानंतर आता त्यानं दिलेली ही कबुली पाहून क्रीडारसिक निराश झाले. जे पाहून अखेर खुद्द विराटने एक ट्विट करत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. मी कधीच विगन असल्याचा दावा केला नव्हता. मी कायम सांगत आलोय की मी शाकाहारी आहे, दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या भाज्या घ्या (जर खाव्याश्या वाटत असतील तर), असं त्याने स्पष्ट केलं. तेव्हा आता विराटच्या या उत्तरावर त्याचे फॉलोअर्स नेमकी कशी प्रतिक्रिया देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

India Vs Pakistan : फायनलमध्ये एकही चेंडू न खेळता ट्रॉफी दिली, मग अंपायरने पाकिस्तानसोबत सेलीब्रेशन केलं; आशिया चषकात नको ते घडलं, सगळ्यात मोठी खळबळ
फायनलमध्ये एकही चेंडू न खेळता ट्रॉफी दिली, मग अंपायरने पाकिस्तानसोबत सेलीब्रेशन केलं; आशिया चषकात नको ते घडलं, सगळ्यात मोठी खळबळ
IND VS NZ 1st Test Day 4 Stumps : वेलिंग्टन कसोटीचा थरार शिगेला! पंतचं वादळी शतक, मग बुमराहने पहिल्याच षटकात गेम फिरवला! चौथ्या दिवशी काय घडलं?
वेलिंग्टन कसोटीचा थरार शिगेला! पंतचं वादळी शतक, मग बुमराहने पहिल्याच षटकात गेम फिरवला! चौथ्या दिवशी काय घडलं?
Dhruv Jurel Catch IND vs NZ 1st Test : बिबट्यासारखी झेप, ध्रुव जुरेलची अफलातून कॅच; शुभमन गिल ओरडत सुटला, अंगावर पडला, न्यूझीलंडची दुसरी विकेट पडताच काय घडलं?
बिबट्यासारखी झेप, ध्रुव जुरेलची अफलातून कॅच; शुभमन गिल ओरडत सुटला, अंगावर पडला, न्यूझीलंडची दुसरी विकेट पडताच काय घडलं?
IND vs PAK Playing XI : अभिषेक शर्मा-वैभव सूर्यवंशी सलामीवीर, तर कुमार कुशाग्र... पाकिस्तानविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
अभिषेक शर्मा-वैभव सूर्यवंशी सलामीवीर, तर कुमार कुशाग्र... पाकिस्तानविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
Ambadas Danve: भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
Sonia Gandhi Home सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
Pune News: पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
Pune News: रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
FDA Action On Nashik Misal Points: नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
Embed widget