Uganda cricket team : युगांडात क्रिकेट क्रांती; टी-20 वर्ल्डकपसाठी पात्र होत इतिहास घडवला! झिम्बाब्वेची हाराकिरी सुरुच राहिल्याने अपात्र
Uganda cricket team : नामिबियाचा संघ आफ्रिका क्वालिफायरद्वारे टी-20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला होता. आता युगांडा क्रिकेट संघाने 2024 टी-20 विश्वचषकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
Uganda cricket team, T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. युगांडा पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत असलेल्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. गेल्या मंगळवारी, नामिबियाचा संघ आफ्रिका क्वालिफायरद्वारे टी-20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला होता. आता युगांडा क्रिकेट संघाने 2024 टी-20 विश्वचषकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यासह सर्व 20 संघ सर्वात लहान फॉरमॅटमध्ये मेगा इव्हेंटसाठी निश्चित झाले आहेत. नामिबिया हा आफ्रिका विभागातील दुसरा संघ पात्र ठरला आहे. दरम्यान, झिम्बाब्वेला सलग दुसऱ्यांदा विश्वचषकात स्थान मिळू शकले नाही. झिम्बाब्वेसाठी हा आणखी एक धक्का आहे.
Uganda qualified into the T20I World Cup 2024....!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) November 30, 2023
- Cricket is growing. 💪pic.twitter.com/gl423TpWsv
झिम्बाब्वेला टी-20 विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी रवांडाच्या युगांडावर विजय मिळवण्यासाठी प्रार्थना करावी लागणार होती, पण युगांडाने स्पर्धेतील त्यांच्या अंतिम सामन्यात रवांडाचा अवघ्या 65 धावांत पराभव केला आणि लक्ष्याचा पाठलाग केवळ 8.1 षटकांत नऊ विकेट्स राखून केला आणि सहा सामन्यांतील आपला पाचवा विजय नोंदवला.
Zimbabwe failed to qualify for the 2024 T20 World Cup...!!! pic.twitter.com/JN44xxCn1e
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 30, 2023
सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे अजूनही केनियाविरुद्ध खेळत आहे आणि त्यांनी 20 षटकांत 217 धावा केल्या आहेत. आता जरी त्यांनी हा सामना जिंकला तरी ते पात्र ठरणार नाहीत आणि युगांडा आणि नामिबियाकडून झालेल्या पराभवामुळे त्यांना धक्का बसला आहे.
The history makers. 🫡🔥
— Johns. (@CricCrazyJohns) November 30, 2023
Uganda going into the T20I World Cup 2024, the greatest achievement in their cricket history. pic.twitter.com/BbkoBGmEHw
वेस्ट इंडिज आणि यूएसए यजमान म्हणून पात्र ठरल्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेची लाइनअप आता निश्चित झाली आहे, तर 2022 टी-20 विश्वचषकातील टाॅप 8 संघांनीही स्पर्धेत स्थान मिळवले आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांनी T टी-20 क्रमवारीच्या आधारे पात्रता मिळवली तर उर्वरित आठ संघ युरोप क्वालिफायर (2 संघ), पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायर (1 संघ), अमेरिका क्वालिफायर (1 संघ), आशिया पात्रता (2 संघ) आणि आफ्रिका त्रता (2 संघ) झाले आहेत.
T20 विश्वचषक 2024 साठी पात्र होणारे संघ
वेस्ट इंडिज, यूएसए, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान , नामिबिया, युगांडा.
इतर महत्वाच्या बातम्या