एक्स्प्लोर

विराटचं शतक तीन धावांनी हुकलं, पहिल्या दिवसअखेर भारत 307/6

टीम इंडियाच्या कर्णधाराने अजिंक्य रहाणेच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 159 धावांची भक्कम भागीदारी रचली. त्यामुळे भारताला पहिल्या दिवसअखेर सहा बाद 307 धावांची मजल मारता आली.

नॉटिंगहॅम : विराट कोहलीने नॉटिंगहॅम कसोटीत कर्णधारास साजेशी खेळी उभारून टीम इंडियाचा डाव सावरला. टीम इंडियाच्या कर्णधाराने अजिंक्य रहाणेच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 159 धावांची भक्कम भागीदारी रचली. त्यामुळे भारताला पहिल्या दिवसअखेर सहा बाद 307 धावांची मजल मारता आली. त्याआधी या कसोटीत शिखर धवन आणि लोकेश राहुलने 60 धावांची सलामी दिली होती. पण ख्रिस वोक्सने धवन, राहुल आणि चेतेश्वर पुजाराला माघारी धाडून टीम इंडियाची तीन बाद 82 अशी केविलवाणी अवस्था केली. विराट आणि अजिंक्यच्या भागीदारीने भारतीय संघाला त्या संकटातून बाहेर काढलं. पण भारतीय कर्णधाराचं शतक तीन धावांनी हुकलं. आदिल रशिदच्या उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात विराटने पहिल्या स्लीपमध्ये बेन स्टोक्सच्या हाती झेल दिला. त्याने 152 चेंडूंत अकरा चौकारांसह 97 धावांची खेळी उभारली. अजिंक्य रहाणेला अखेर सूर गवसला टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अखेर सूर गवसला. त्याने नॉटिंगहॅम कसोटीत आपल्या भात्यातले फटके काढून लौकिकाला साजेशी खेळी उभारली. या खेळीत त्याने मानसिक ओझं झुगारून फलंदाजी केल्याचं दिसलं. अजिंक्यने 131 चेंडूंत 12 चौकारांसह 81 धावांची खेळी उभारली. त्याने आपल्या कर्णधाराला दिलेली दमदार साथ भारताच्या डावाच्या उभारणीत मोलाची ठरली. ऋषभ पंतने आपल्या पहिल्याच सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. सध्या तो 22 धावांवर खेळत आहे. 23 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 75 षटकार आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याने दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test : सिराज पुन्हा बाहेर, गुरनूर ब्रारचं पदार्पण! टीम इंडिया हतबल, न्यूझीलंडने धू धू धुतलं, दुसऱ्या कसोटीत पहिल्या सत्रात नेमकं काय घडलं?
सिराज पुन्हा बाहेर, गुरनूर ब्रारचं पदार्पण! टीम इंडिया हतबल, न्यूझीलंडने धू धू धुतलं, दुसऱ्या कसोटीत पहिल्या सत्रात नेमकं काय घडलं?
317 धावा करुनही भारताचा दारुण पराभव, विजयासह श्रीलंकेची अंतिम फेरीत धडक, भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी  
317 धावा करुनही भारताचा दारुण पराभव, विजयासह श्रीलंकेची अंतिम फेरीत धडक, भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी  
Ind vs NZ 2nd Test Match Team India Probable playing XI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा IN...; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सिराज, जडेजा IN...; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Embed widget