एक्स्प्लोर

तुम्हाला पुरुष कसं म्हणायचं, विराट कोहलीचा संताप

मुंबई: बंगळुरुतील 31 डिसेंबरच्या पाशवी घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उठली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याबाबत अभिनेता अक्षय कुमारने धारदार शब्दात आपला राग व्यक्त केल्यानंतर, आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही पुढे आला आहे.

"हा देश सुरक्षित आणि सर्वांसाठी समान असायलाच हवा.

महिलांना दुय्यम स्थान का? चला आपण एकत्र येऊ आणि

अशा घृणास्पद घटनांविरोधात उभे राहू"

असं ट्विट विराट कोहलीने केलं आहे.

इतकंच नाही तर विराटने यासोबत स्वत:चा व्हिडीओ मेसेजही शेअर केला आहे. विराट म्हणतो, "बंगळुरुमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री जे काही घडलं ते अत्यंत संतापजनक होतं. त्या मुलीबाबत छेडछाड होत असताना, केवळ बघ्याची भूमिका घेणारे भ्याड आहेत. त्यांना पुरुष म्हणणंही चुकीचं ठरेल. जर तुमच्या कुटुंबातील स्त्री/मुलीसोबत अशी घटना घडली असती, तर त्यावेळीही तुम्ही अशीच बघ्याची भूमिका घेतली असती, की तिला मदत केली असती? त्या मुलीने तोकडे कपडे घातले होते, म्हणून तिच्यासोबत अशी घटना घडली, असं म्हणणारे अशा नराधमांच्या कृत्याला एकप्रकारे पाठबळ देतात. मात्र कोणत्याही व्यक्तीला किंवा त्या मुलीला तीने काय घालावं, कसं राहावं, कसं जगावं हा तिचा/त्याचा प्रश्न आहे, तिचं स्वातंत्र्य आहे. तोकड्या कपड्यातील मुलीची छेड काढणं जर कोणाला संधी वाटत असेल आणि जे लोक या कृत्याचं समर्थन करत असतील तर ते अतिशय भयानक आहे" "अशी विकृत मानसिकता असणं धक्कादायक आहे आणि अशी माणसं आपल्या समाजात आहेत, आणि मी या सोसायटीचा भाग असणं याची मला लाज वाटते. आपण आपली विचारधारा बदलायला हवी. महिलांना सन्मान देणं शिकायला हवं. बंगळुरुतील घटनेतील मुलगी तुमच्या घरातील असती, तर तुम्ही काय केलं असता, हा पुन्हा एकदा विचार करा, जय हिंद" https://twitter.com/imVkohli/status/817230961116999680 बंगळुरुतील घृणास्पद प्रकार आयटी हब बंगळुरुमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त असतानाही मुलींचा विनयभंग झाला. त्यानंतर एका तरुणीची भर रस्त्यात छेडछाड झाली. नववर्षाच्या पार्टीनंतर घरी परतणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. भर रस्त्यात मध्यरात्री दोन नराधम तरुणीवर जबरदस्ती करत असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. शहरातील कम्मनहळ्ळी भागात राहणारी ही तरुणी मध्यरात्री अडीच वाजता आपल्या घरी परतत होती. रिक्षातून उतरल्यानंतर घरी चालत परतत असताना, मागून आलेल्या दोन बाईकस्वारांनी तिला अडवलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली. सुमारे 30 सेकंदाच्या घृणास्पद प्रकारानंतर तरुणीने आरडाओरडा केला. त्यानंतर नराधमांनी तिला ढकलून तिथून पळ काढला. संबंधित बातमी
बंगळुरु विनयभंग प्रकरणी पाच दिवसांनी कारवाई, चौघांना बेड्या
मी पण एका मुलीचा बाप, बंगळुरुच्या घटनेने माझं रक्त खवळलं : अक्षय
बंगळुरुत तरुणीचा विनयभंग, घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice KU Chandiwal : निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचे ABP Majhaवर गौप्यस्फोटABP Majha Headlines :  12 PM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :13 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaJustice Chandiwal : न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटावर अजितदादा,सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Embed widget