एक्स्प्लोर
मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये फसवणुकीची तक्रार
मारिया शारापोव्हा स्वतः इथे टेनिस अकादमी चालवेल, अशी माहिती बिल्डरने गृहप्रकल्प बांधताना दिली.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टेनिसस्टार मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये फसवणुकीची तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. गृह खरेदीदाराच्या तक्रारीनंतर दिल्ली हायकोर्टाने बिल्डर कंपनी, तिचे अधिकारी आणि शारापोव्हाविरोधात फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदार भावना अग्रवाल यांनी गुरुग्रामच्या सेक्टर 73 मध्ये होमस्टेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि. अंतर्गत 'बॅलेट बाय शारापोव्हा' नावाच्या रहिवाशी प्रकल्पात एक फ्लॅट घेतला. 2013 साली या फ्लॅटसाठी 53 लाख रुपये अग्रवाल यांच्याकडून घेण्यात आला. मारिया शारापोव्हा स्वतः इथे टेनिस अकादमी चालवेल, अशी माहिती बिल्डरने त्यावेळी दिली.
पहिला हप्ता जमा केल्यानंतर तीन वर्षात प्रकल्प पूर्ण होईल, असा दावा बिल्डर कंपनीने केला होता. मात्र ते आश्वासन पाळण्यास कंपनी अपयशी ठरली. त्यामुळे भावना अग्रवाल यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावत फसवणूक, दिशाभूल केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.
कंपनीची जाहिरात आणि वेबसाईटवर मारिया शारापोव्हा स्वतः इथे टेनिस अकादमी चालवेल, असा दावा करण्यात आला आहे. शारापोव्हा जेव्हा-जेव्हा भारतात येईल, तेव्हा ट्रेनिंग सेशन चालवण्याचं आश्वासनही जाहिरातीत देण्यात आलं होतं.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















