एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टेनिसमध्ये स्पेनचा दबदबा, एकाचवेळी नदाल आणि मुगुरुझा अव्वलस्थानी
राफेल नदाल आणि गार्बिनी मुगुरुझा या स्पेनच्याच दोन टेनिसपटूंनी एकाचवेळी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या जागतिक क्रमवारीत नंबर वन होण्याचा मान मिळवला आहे.
राफेल नदाल आणि गार्बिनी मुगुरुझा या स्पेनच्याच दोन टेनिसपटूंनी एकाचवेळी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या जागतिक क्रमवारीत नंबर वन होण्याचा मान मिळवला आहे. पुरुषांच्या एटीपी आणि महिलांच्या डब्ल्यूटीए क्रमवारीची सोमवारी घोषणा झाली.
राफेल नदालनं अमेरिकन ओपन जिंकून एटीपी क्रमवारीतलं आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं. अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारणाऱ्या गार्बिनी मुगुरुझानं डब्ल्यूटीए क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरून अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.
त्यामुळं पुरुष आणि महिला टेनिसच्या जागतिक क्रमवारीत एकाचवेळी दोन स्पॅनिश खेळाडू पाहायला मिळत आहेत. याआधी 2003 साली अमेरिकेच्या आंद्रे आगासी आणि सेरेना विल्यम्सनं एकाचवेळी नंबर वन होण्याचा मान मिळवला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement