IND vs ENG, India Squad : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी
प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यात सहा विकेट घेतले आहे. या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेट आपल्या डेब्यू सामन्यात चार विकेट घेतले होते.
IND vs ENG, 4th Test : इंडिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 2 सप्टेंबरपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. चौथ्या कसोटीसाठी बीसीसीआयनं नुकतंच इंग्लंडच्या संघासोबतच्या आगामी चौथ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला. संघात नेमका कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश असेल याचा उलगडा बीसीसायकडून ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. चौथ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.
प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यात सहा विकेट घेतले आहे. या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेट आपल्या डेब्यू सामन्यात चार विकेट घेतले होते.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेट कीपर), आर. आश्विन, रविंद्र जडेजा, अक्सर पटेल, जसप्रित बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, रिद्धीमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सुर्यकुमार यादव, प्रसिद्द कृष्णा
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचं 16 खेळाडूंचं स्क्वॉड
रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जो रूट (कप्तान), डेन लॉरेन्स, जॉनी बेयरिस्टो (विकेटकीपर), मोईन अली, सैम कर्रन, क्रेग ओवर्टन, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन, ओली पोप, सैम बिलिंग्स, मार्क वुड और क्रिस वोक्स.
भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने झाले असून दोन्ही संघानं एक-एक सामना जिंकला आहे. तर पहिला सामना अनिर्णित झाला होता.
संबंधित बातम्या :