WTC Final 2021: महान धावपटू मिल्खा सिंह यांना टीम इंडियाची अनोखी आदरांजली, काळी पट्टी बांधून खेळाडू मैदानात
WTC Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आज सुरु झाला आहे. फायनल सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. भारताचे धावपटू मिल्खा सिंह यांना आदरांजली म्हणून टीम इंडियानं हे पाऊल उचललं आहे.
WTC Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आज सुरु झाला आहे. फायनल सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. भारताचे धावपटू मिल्खा सिंह यांना आदरांजली म्हणून टीम इंडियानं हे पाऊल उचललं आहे. मिल्खा सिंह यांचं शुक्रवारी कोरोनामुळं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. महान धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणार असल्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मिल्खा सिंग यांच्या सन्मानार्थ एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारताच्या या महान खेळाडूला टीम इंडियानं अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस 'पाण्यात'!
साऊदम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला जात आहे. मात्र पहिल्या दिवशी साऊदम्पटनमध्ये पाऊस झाल्यानं क्रीडा प्रेमींची निराशा झाली. पावसाच्या बॅटिंगमुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाया गेला. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता हा सामना सुरु होणार होता. पावसामुळे आणि आऊट फिल्डवर पावसाचे पाणी असल्याने सामना खेळला गेलाच नाही.पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना सुरू करणे शक्य होणार नसल्याचे सांगितलं. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
WTC 2021 Live Updates : कसोटी विश्वचषक फायनल सामना, लाईव्ह अपडेट
टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात
कोणता संघ या सामन्याचं जेतेपद पटकावेल आणि 'जगात भारी' ठरेल, असेच प्रश्न अनेक क्रीडारसिकांच्या मनात घर करुन आहेत. हा सामना भारतीय संघानं जिंकल्यास विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाच्या वाट्याला आलेलं हे मोठं यश ठरणार आहे. बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्या 11 खेळाडूंची घोषणा केली.अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.