Milkha Singh Death: मिल्खा सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर
मिल्खा सिंग यांच्या सन्मानार्थ पंजाब सरकारने एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. मिल्खा सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिली.
चंदीगड: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांच्यावर शनिवारी संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जवळपास महिनाभर कोरोना संक्रमणाशी झुंज देऊन रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. मिल्खा सिंह यांच्या निधनानंतर पंजाब सरकारने एक दिवस राज्य शोक जाहीर केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी धावपटू मिल्खा सिंग यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पोहोचले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Former Indian sprinter Milkha Singh will be given State funeral by Punjab Government. Also, Punjab will observe one day of State mourning as a mark of respect: Punjab Chief Minister Captain Amarinder Singh pic.twitter.com/vDFhCiHLJy
— ANI (@ANI) June 19, 2021
देशाचे अभिमान असलेले महान धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणार असल्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मिल्खा सिंग यांच्या सन्मानार्थ एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. 'फ्लाइंग शीख' या नावाने प्रसिद्ध असलेल्या 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना गुरुवारी कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांची तब्बेत अचानक खालावली आणि त्यातच त्यांनी प्राण सोडले. शनिवारी संध्याकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Upset and saddened to hear of Milkha Singh Ji’s demise. It marks the end of an era and India & Punjab are poorer today. My condolences to the bereaved family & millions of fans. The legend of the Flying Sikh will reverberate for generations to come. Rest in peace Sir! pic.twitter.com/7yK8EOHUnS
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) June 18, 2021
तत्पूर्वी, ट्विटद्वारे अमरिंदरसिंग यांनी मिल्खा सिंग यांच्या मृत्यूवर तीव्र दुःख व्यक्त केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "मिल्खासिंग जी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले आहे. हा एका युगाचा शेवट आहे. संपूर्ण देश आणि पंजाबचे हे खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुबियांबद्दल आणि त्यांच्या लाखो चाहत्यांविषयी माझ्या सहवेदना आहेत. येणाऱ्या कित्येक पिढ्यांपर्यंत फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांचे नाव जगभर लक्षात राहील."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केले की, "आज श्री मिल्खासिंग जी यांचे निधन झाल्यामुळे आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे. त्यांनी आपल्या खेळाने देशाच्या स्वप्नांना नवीन उड्डाण दिले. मिल्खा सिंग यांना भारतीय लोकांच्या हृदयात खास स्थान आहे, त्यांनी आपल्या प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाने कोट्यावधी लोकांच्या जीवनावर परिणाम केला. त्यांच्या निधनाने मला फार दु:ख झाले आहे. मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे याच आठवड्यात वयाच्या 85 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर पाचच दिवसात मिल्खाही जग सोडून गेले.
In the passing away of Shri Milkha Singh Ji, we have lost a colossal sportsperson, who captured the nation’s imagination and had a special place in the hearts of countless Indians. His inspiring personality endeared himself to millions. Anguished by his passing away. pic.twitter.com/h99RNbXI28
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2021
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडूनही दुःख व्यक्त
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, भारताने एक महान खेळाडू गमावला आहे. ते म्हणाले, "मिल्खा जी आता आमच्या पाठीशी नाहीत पण त्यांनी प्रत्येक भारतीयाला देशाचे वैभव प्राप्त करण्यासाठी प्रेरित केले आहे. फ्लाइंग शीख नेहमीच भारतीयांच्या मनात राहतील."