एक्स्प्लोर
विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
कर्नाटकच्या मयांक अगरवालचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे.
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर शिखर धवनला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकर पृथ्वी शॉचं कसोटी पदार्पण निश्चित मानलं जात आहे.
कर्नाटकच्या मयांक अगरवालचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे.
दुखापतग्रस्त ईशांत शर्मा आणि हार्दिक पंड्याचा मात्र या संघनिवडीसाठी विचार करण्यात आलेला नाही. 4 ऑक्टोबरला राजकोटमध्ये मालिकेतल्या पहिल्या कसोटीला सुरुवात होईल.
टीम इंडिया :
विराट कोहली (कर्णधार)
केएल राहुल
पृथ्वी शॉ
मयांक अगरवाल
चेतेश्वर पुजारा
अजिंक्य रहाणे (उपकर्णधार)
हनुमा विहारी
ऋषभ पंत
आर अश्विन
रवींद्र जाडेजा
कुलदीप यादव
मोहम्मद शमी
उमेश यादव
मोहम्मद सिराज
शार्दूल ठाकूर
Indian team: Virat Kohli (captain), KL Rahul, Prithvi Shaw, Mayank Agarwal, C Pujara, Ajinkya Rahane (vc), H Vihari, Rishabh Pant (wk), R Ashwin, R Jadeja, Kuldeep Yadav, M Shami, Umesh Yadav, M Siraj, Shardul Thakur
— BCCI (@BCCI) September 29, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्राईम
क्रिकेट
राजकारण
Advertisement