एक्स्प्लोर
नेहमीच्या शैलीत षटकार, 2 चौकार आणि 3 झेल, रैनाचं दमदार कमबॅक
फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं. तीन महत्त्वाचे झेल घेत त्याने भारताच्या या विजयात मोलाची भूमिका निभावली.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यातून फलंदाज सुरेश रैनाने दमदार पुनरागमन साजरं केलं. नेहमीच्याच शैलीत फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं. तीन महत्त्वाचे झेल घेत त्याने भारताच्या या विजयात मोलाची भूमिका निभावली.
फलंदाजीची स्फोटक सुरुवात करत सुरेश रैनाने पुनरागमन साजरं केलं. शिवाय त्याने क्षेत्ररक्षणातही चुणूक दाखवली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार जेपी ड्युमिनीचा पहिलाच झेल त्याने घेतला. त्यानंतर 18 व्या षटकात विकेटकीपर फलंदाज क्लासेनचा झेल घेत रैनाने दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा धुळीला मिळवल्या.
रैनाने घेतलेला झेल :
हे दोन्ही झेल घेतल्यानंतर अखेरच्या षटकातील सर्वात महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडण्यात रैनाने मोलाची भूमिका निभावली. 18 व्या षटकात ख्रिस मॉरिसचा झेल घेऊन रैनाने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अनेक दिवसांनी कमबॅक केल्यानंतर सुरेश रैनाची बॅटही तळपली. रैनाने 7 चेंडूंचाच सामना केला, मात्र या 7 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि एक षटकार ठोकत 15 धावा केल्या. रैनाचा षटकार :Beautiful! pic.twitter.com/R2M2kCSPQe
— Cricket Videos (@cricvideos11) February 18, 2018
First six on comeback! pic.twitter.com/ENNsV53YZX — Cricket Videos (@cricvideos11) February 18, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement