एक्स्प्लोर
बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताचं आव्हान संपुष्टात
रिओ दी जेनैरोः भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने पराक्रमाची शर्थ केली, पण चीनच्या लिन डॅनने श्रीकांतचं ऑलिम्पिकमधलं आव्हान मोडीत काढलं. त्यामुळे रिओमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत भारताचं पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
श्रीकांतने या सामन्यात दोनवेळच्या ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या डॅनला कडवी टक्कर दिली. पण अखेर श्रीकांतला 6-21, 21-11, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला. यासोबतच रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत भारताचं आव्हानही संपुष्टात आलं.
यानंतर आता बॅडमिंटन एकेरीत आता सर्वांचं लक्ष पी. व्ही. सिंधूकडे लागले आहेत. सिंधू उद्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीसाठी मैदानात उतरणार आहे. सिंधू आता पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
भारत
नागपूर
Advertisement