एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीलंकेचे खेळाडू पुन्हा एकदा 'मास्क' लावून मैदानावर
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात मास्क लावून खेळणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंनी चौथ्या दिवशी देखील तोच प्रकार पुन्हा केला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात मास्क लावून खेळणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंनी चौथ्या दिवशी देखील तोच प्रकार पुन्हा केला आहे.
श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांवर आटोपल्यावर भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. दुसऱ्या डावातील पाचव्या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लकमलला मैदानावरच उलटी झाली. यावेळी संघाचे फिजिओ देखील मैदानावर धावत आले. त्यानंतर लकमलनं मैदान सोडलं आणि तो ड्रेसिंग रुममध्ये परतला. यानंतर अनेक श्रीलंकन खेळाडू हे मास्क लाऊन मैदानावर परतले. प्रदूषणामुळे त्रास होत असल्याचा दावा श्रीलंकन खेळाडूंकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या सामन्यातील दुसऱ्या दिवशी प्रदूषणाचा स्तर वाढल्यानं श्रीलंकेचे खेळाडू मास्क लावून मैदानावर उतरले होते. यावेळी पंचानी दोनदा सामना थांबवला देखील होता. त्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी खेळ थांबवण्याची विनंती केली. मात्र पंचांनी याला नकार दिला होता. या सर्व प्रकारामुळे दिल्लीतील कसोटीची क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे.
दिल्ली कसोटीच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांवर आटोपला. श्रीलंकेनं कालच्या 9 बाद 356 या धावसंख्येत केवळ 17 धावांची भर घातली. ईशांत शर्मानं कर्णधार दिनेश चंडिमलला माघारी धाडत भारताला पहिल्या डावात 163 धावांची आघाडी मिळवून दिली. चंडिमलनं 21 चौकार आणि एका षटकारासह 164 धावांची दमदार खेळी उभारली.
भारताकडून ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं दोन प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
संबंधित बातम्या :
दिल्लीतील प्रदूषणामुळे श्रीलंकेवर मास्क लावून खेळण्याची वेळ
INDvsSL : दुसऱ्या डावातही रहाणे अपयशी, भारताचे दोन गडी बाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement