(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SRH vs DC, Super Over: दिल्ली-हैदराबाद सामना टाय, सुपरओव्हरचा रोमांच, केन विल्यमसन, सुचितची धडाकेबाज खेळी
SRH vs DC, IPL 2021 Super Over:चेन्नईत सुरु असलेला दिल्ली आणि हैदराबादमध्ये झालेल्या रोमांचक सामना अखेर टाय झाला आहे. हैदराबादनं दिल्लीच्या 160 धावांचा पाठलाग करताना 159 धावा केल्या. केन विल्यमसनची झुंजार अर्धशतकी खेळी आणि जगदीश सुचितच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर हैदराबादनं शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करत सामना टाय केला.
SRH vs DC, IPL 2021 Super Over: चेन्नईत सुरु असलेला दिल्ली आणि हैदराबादमध्ये झालेल्या रोमांचक सामना अखेर टाय झाला आहे. हैदराबादनं दिल्लीच्या 160 धावांचा पाठलाग करताना 159 धावा केल्या. केन विल्यमसनची झुंजार अर्धशतकी खेळी आणि जगदीश सुचितच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर हैदराबादनं शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करत सामना टाय केला.
दिल्लीच्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्याच षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नर 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर आक्रमक खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टो बाद झाला. बेअरस्टोने 3चौकार आणि 4 षटकारांसह 38 धावा केल्या. त्यानंतर विराट सिंह, केदार जाधव अपयशी ठरले. दुसरीकडे झुंजार खेळी करत केन विल्यमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अक्षर पटेलने एकाच षटकात अभिषेक शर्मा आणि राशिद खानला बाद करत हैदराबादला अडचणीत आणले. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 16 धावांची गरज होती. या षटकात विल्यमसन आणि सुचितने फटकेबाजी करत 15 धावा केल्या, त्यामुळं सामना टाय झाला.
त्याआधी दिल्लीनं हैदराबादसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलामीवीर पृथ्वी शॉचं शानदार अर्धशतक तसेच ऋषभ पंत, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथच्या चांगल्या खेळीच्या बळावर दिल्लीनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 159 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली सुरुवात करुन दिली. पावरप्लेच्या 6 षटकात या दोघांनी 51 धावा केल्या. धवन-शॉने पहिल्या गड्यासाठी 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शिखर धवन 28 धावांवर बाद झाला. शिखरनंतर पृथ्वी शॉ देखील धावबाद झाला. त्याने 7 चौकार आणि एका षटकारासह 53 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संयमी खेळी केली. 19 व्या षटकात सिद्धार्थ कौलने पंतला बाद केले. पंतने 4 चौकार आणि एका षटकारासह 37 धावा केल्या. पंतनंतर आलेल्या हेटमायरला एकच धाव करता आली. स्टिव्ह स्मिथनं 25 चेंडूत 34 धावा काढल्या. त्यानं आपल्या खेळीत 3 चौकार आणि एक षटकार खेचला. दिल्लीला चांगली सुरुवात होऊनही 20 षटकात 159 धावांवर समाधान मानावे लागले. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलनं 2 तर राशिद खाननं एक विकेट घेतली.