एक्स्प्लोर

SRH vs DC, Super Over: रोमांचक सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा हैदराबादवर 'सुप्पर' विजय, शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस...

SRH vs DC, IPL 2021 Super Over: चेन्नईत सुरु असलेला दिल्ली आणि हैदराबादमध्ये झालेल्या रोमांचक सामना टाय झाला. त्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्ये हैदराबादवर मात केली. सुपरओव्हरमध्ये हैदराबादनं दिल्लीसमोर सहा चेंडूत 8 धावांचं आव्हान दिलं होतं.

SRH vs DC, IPL 2021 Super Over: चेन्नईत सुरु असलेला दिल्ली आणि हैदराबादमध्ये झालेल्या रोमांचक सामना टाय झाला. त्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्ये हैदराबादवर मात केली. सुपरओव्हरमध्ये हैदराबादनं दिल्लीसमोर सहा चेंडूत 8 धावांचं आव्हान दिलं होतं. सुपरओव्हरमध्ये हैदराबादच्या केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नरला केवळ सातच धावा करता आल्या. दिल्लीच्या शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी हे आव्हान सहा चेंडूत पूर्ण करत विजय साजरा केला. सुपर ओव्हर देखील रोमांचक झाली. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला.  या विजयासह दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

त्याआधी  दिल्लीनं हैदराबादनं दिल्लीच्या 160 धावांचा पाठलाग करताना 159 धावा केल्या. केन विल्यमसनची झुंजार अर्धशतकी खेळी आणि जगदीश सुचितच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर हैदराबादनं शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करत सामना टाय केला. दिल्लीच्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्याच षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नर 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर आक्रमक खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टो बाद झाला. बेअरस्टोने 3चौकार आणि 4 षटकारांसह 38 धावा केल्या. त्यानंतर विराट सिंह, केदार जाधव अपयशी ठरले. दुसरीकडे झुंजार खेळी करत केन विल्यमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अक्षर पटेलने एकाच षटकात अभिषेक शर्मा आणि राशिद खानला बाद करत हैदराबादला अडचणीत आणले. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 16 धावांची गरज होती. या षटकात विल्यमसन आणि सुचितने फटकेबाजी करत 15 धावा केल्या, त्यामुळं सामना टाय झाला.

त्याआधी दिल्लीनं हैदराबादसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलामीवीर पृथ्वी शॉचं शानदार अर्धशतक तसेच ऋषभ पंत, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथच्या चांगल्या खेळीच्या बळावर दिल्लीनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 159 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली सुरुवात करुन दिली. पावरप्लेच्या 6 षटकात या दोघांनी 51 धावा केल्या.   धवन-शॉने पहिल्या गड्यासाठी 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शिखर धवन 28 धावांवर बाद झाला. शिखरनंतर पृथ्वी शॉ देखील धावबाद झाला. त्याने 7 चौकार आणि एका षटकारासह 53 धावा केल्या.  त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संयमी खेळी केली. 19 व्या षटकात सिद्धार्थ कौलने पंतला बाद केले. पंतने 4 चौकार आणि एका षटकारासह 37 धावा केल्या. पंतनंतर आलेल्या हेटमायरला एकच धाव करता आली. स्टिव्ह स्मिथनं 25 चेंडूत 34 धावा काढल्या. त्यानं आपल्या खेळीत 3 चौकार आणि एक षटकार खेचला. दिल्लीला चांगली सुरुवात होऊनही 20 षटकात 159 धावांवर समाधान मानावे लागले. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलनं 2 तर राशिद खाननं एक विकेट घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Embed widget