एक्स्प्लोर
'चेन्नई सुपरकिंग्ज'स्टार एल्बी मॉर्केलचा क्रिकेटमधून संन्यास
2008 आणि 2013 साली आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयी संघाचा भाग असलेला दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे
मुंबई : जवळपास 15 वर्ष क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्टाईलिश फलंदाज एल्बी मॉर्केलने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटला अलविदा करण्याचा निर्णय मॉर्केलने जाहीर केला. आयपीएलमुळे 37 वर्षीय मॉर्केलला भारतात ओळख मिळाली.
एल्बी मॉर्केलने 2004 साली दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघातून पदार्पण केलं. वन डे कारकीर्दीत त्याने 782 धावा आणि 50 विकेट्स मिळवल्या आहेत. मॉर्केल 2005 साली दक्षिण आफ्रिकेच्या टी20 संघात होता. टी20 मध्ये त्याने 572 धावा ठोकत 26 विकेट्स मिळवल्या. 2009 साली त्याने एकमेव कसोटी सामना खेळला.
मॉर्केलने 2015 मध्ये देशासाठी शेवटचा टी20 सामना खेळला, तर वनडे क्रिकेटमध्ये त्याला 2012 साली अखेरची संधी मिळाली होती.
आयपीएलमुळे एल्बी मॉर्केलला भारतात नव्याने ओळख मिळाली. चेन्नई सुपरकिंग्ज संघातून त्याने आयपीएल कारकीर्द सुरु केली. 2008 आणि 2013 साली तो चेन्नईच्या विजयी संघाचा भाग होता. त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्समधूनही खेळला. आयपीएलमध्ये 91 सामने खेळलेल्या एल्बीने 974 धावा केल्या, तर 85 विकेट्स मिळवल्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मॉर्केलने 77 सामन्यांमध्ये चार हजारांपेक्षा अधिक धावा ठोकल्या आहेत. 204 हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. तर त्याने 203 विकेट्स घेण्याचा पराक्रमही गाजवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नांदेड
बीड
राजकारण
Advertisement