एक्स्प्लोर
धर्मांतरामुळे चर्चेत आलेल्या 'या' क्रिकेटरचं लग्न
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर वेन पर्नेल लग्नाच्या बेडीत अडकला आहे. केपटाऊनमधील एका मशिदीत हा छोटेखानी समारंभ पार पडला. या निकाहमध्ये सुमारे 400 पाहुण्यांचा समावेश होता. त्याच्या लग्नाचे फोटो आता समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
26 वर्षीय वेन पर्नेलच्या पत्नीचं नाव आएशा बकर असून ती फॅशन ब्लॉगर आहे. पर्नेलचा निकाह केपटाउन शहरच्या सिक्स डिस्ट्रिक्टच्या जीनातुल इस्लाम मशिदीत झाला.
धर्मांतरामुळे पर्नेल चर्चेत
- धर्मांतर केल्याने वेन पर्नेल चर्चेत आला होता. 2011 मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. शिवाय त्याने त्याचं नावही बदललं होतं.
- पर्नेलने स्वत:चं नाव मोहम्मद वालिद ठेवलं होतं. वालिदचा अर्थ 'नव्याने जन्माला आलेलं बाळ'. योगायोगाने त्याच्या सासऱ्याचं नावही वालिदच आहे.
निकाहनंतर पर्नेल विडींज दौऱ्यावर
मात्र लग्नानंतर पर्नेलला त्याच्या पत्नीसोबत जास्त वेळ घालवता येणार नाही. हे नवविवाहित जोडपं केवळ तीनच दिवस एकत्र राहतील. कारण वेन पर्नेल त्याच्या टीमसोबत वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे.
वेन पर्नेलने दक्षिण आफ्रिका संघाकडून चार कसोटी, 46 वन डे आणि 35 ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement