एक्स्प्लोर

FIFA World Cup Marathi Post: इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना

FIFA World Cup Marathi Post: सोशल मीडियामध्ये फिफाकडून एक पोस्ट करण्यात आली असून, ती जबरदस्त चर्चेचा आणि सोशल मीडियामध्ये कमेंटचा विषय झाला आहे.

FIFA World Cup Marathi Post: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेमध्ये शोकप्रस्ताव मांडताना ज्या काही गंभीर चुका केल्या, त्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून सडकून टीका सुरू आहे. त्यांनी ज्या पद्धतीने शोकप्रस्ताव वाचला यामुळे मराठीचीच अब्रू निघाली, इतकेच नव्हे तर लक्तरे वेशीवर टांगली गेली, अशीच भावना मराठी जनांमधून उमटली. दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्या मराठी वाचनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा हल्लाबोल केला. दुसरीकडे, चौफेर टीकेनंतर राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी विधानसभेमध्ये बोलताना "मी जवळपास गेल्या साडेचार वर्षांपासून विधानसभेचा अध्यक्ष आहे. 12 शोक प्रस्ताव होते, त्यामध्ये फॉन्ट छोटा होता, त्यामध्ये काही तांत्रिक चुका होत्या, त्यामुळे ते मी नीट पद्धतीने वाचू शकलो नाही," अशी प्रतिक्रिया दिली.

"रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय"

दरम्यान, आता इकडे राहुल नार्वेकर यांच्या एकंदरीत मराठी वाचनावरून हल्लाबोल सुरू असतानाच, फिफाने (FIFA) मात्र कडक मराठी तडका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील मातृभाषांमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न फिफा वर्ल्डकप निमित्ताने होत आहे. आजही सोशल मीडियामध्ये फिफाकडून एक पोस्ट करण्यात आली असून, ती जबरदस्त चर्चेचा आणि सोशल मीडियामध्ये कमेंटचा विषय झाला आहे. फिफाने पोस्ट करताना "रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय" असं म्हणत रॉनाल्डोच्या फोटोसह पोस्ट केली आहे. या पोस्टवर हजारो कमेंट मराठी जणांकडून पडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. त्यामुळे काहींनी या "मराठीत मराठी, त्यात कोल्हापुरी मराठी, कोल्हापुरी दणका, कोल्हापुरी विषय, मराठीचा वाजतोय डंका," अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by FIFA World Cup (@fifaworldcup)

कोल्हापुरात चौकाचौकांमध्ये कटआऊट्स  

इतकेच नव्हे तर "जगात भारी कोल्हापुरी" असा सुद्धा सूर या पोस्टवर उमटला आहे. त्यामुळे एकंदरीतच फिफाने जगभरातील मातृभाषांमधून, तसेच विशेष करून भारतीय मातृभाषांमधून जो चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची चांगलीच चर्चा होत आहे. दुसरीकडे, कोल्हापूर फुटबॉलचे माहेरघर आहे. जवळपास शेकडो फुटबॉल वर्ल्डकप निमित्ताने बॅनर्स उभा राहिले आहेत. चौकाचौकांमध्ये कटआऊट्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये अर्जेंटिना, ब्राझील, पोर्तुगाल देशांविषयी विशेष आकर्षण असल्याचं दिसून येत आहे. मात्र सर्वाधिक मेस्सी प्रेमी जनता कोल्हापूरमध्ये असल्याचं लावलेल्या होर्डिंग्समधून आणि कटआऊटमधून समोर येत आहे. त्यामुळे कोल्हापुरी चाहत्यांमध्ये रोनाल्डो विरुद्ध मेस्सी चाहते असाच एकंदरीत सामना पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या फुटबॉलची चुरशीने जी स्पर्धा होत असते किंवा जो संघर्ष होत असतो, तो नेहमीच छत्रपती शाहू स्टेडियमवर पाहायला मिळत असतो.

इतर महत्वाच्या बातम्या

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget