Aesha Mukerji on Instagram :नऊ वर्षाच्या सुखी संसारानंतर शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी नऊ वर्षापूर्वी 2012 साली विवाहबंधनात अडकले होते. धवन आणि आयशा यांना एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे.
मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनच्या घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर शिखरची पत्नी आयेशा मुखर्जीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आयशाने मुखर्जीने घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लिहली आहे. परंतु या संदर्भात शिखर धवनकडून या बातमीला दुजोरा दिलेला नाही. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी नऊ वर्षापूर्वी 2012 साली विवाहबंधनात अडकले होते. धवन आणि आयशा यांना एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे. आयशा शिखरपेक्षा दहा वर्षाने मोठ आहे. आयशाचा हा शिखर धवनशी दुसरा विवाह होता. आयशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. त्यानंतर 2014 साली आयशाने जोरावरला जन्म दिला. धवन आणि आयशाच्या लग्नावर अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते.
2020 साली शिखर आणि आयशाच्या नात्यामध्ये तणाव असल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. त्यानंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले. तसेच आयशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउऊंटवरून शिखरचे सगळे फोटो काढले आहे. मात्र धवनने आयशाचे फोटो काढलेले नाही. आयशाने घटस्फोटानंतर इन्स्टाग्रामवर लिहिले की, पुन्हा एकदा घटस्फोट झाल्यासारखे वाटते आहे. पुन्हा एकदा सगळं पणाला लागले आहे. जेव्हा माझे दुसरे लग्न तुटणे हे भीतिदायक आहे. घटस्फोट हा शब्द इतका वाईट परंतु माझा तर दोनदा घटस्फोट झाला आहे.
View this post on Instagram
पहिल्यांदा घटस्फोट घेतल्यावर मी खूप घाबरलो होतो. मला असे वाटले की मी अयशस्वी झाले आहे आणि त्यावेळी वाटले की मी खूप चुकीचे करत होते. मला वाटले की मी सर्वांना निराश केले आहे आणि मी स्वार्थी देखील आहे. मला वाटले की मी माझ्या पालकांना निराश करत आहे. मला वाटले की, मी माझ्या मुलांचा अपमान करत आहे आणि काही प्रमाणात मला असे वाटले की मी देवाचाही अपमान केला आहे. घटस्फोट हा एक अतिशय घाणेरडा शब्द होता. पण हे माझ्यासोबत पुन्हा घडले. ते भयंकर होते. एकदा घटस्फोट घेतल्यानंतर, दुसऱ्यांदा मला असे वाटले की माझ्याकडे बरेच काही आहे. मला बरेच काही सिद्ध करायचे होते. म्हणून जेव्हा माझे दुसरे लग्न मोडले तेव्हा ते खूप वाईट होते. मी पहिल्यांदा ज्या भावनांमधून गेलो होतो ते पुन्हा परत आले. शंभर पट भीती, अपयश आणि निराशा... '