एक्स्प्लोर

शिखर धवन हैदराबादची साथ सोडून मुंबईच्या ताफ्यात येण्याची शक्यता

ट्रेड ऑफच्या माध्यमातून खेळाडूंची अदलाबदली केली जाऊ शकते. मुंबई इंडियन्सनेही ट्रेड ऑफच्या माध्यमातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या क्विंटन डी कॉकला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं आहे.

मुंबई : आयपीएलमधील स्टार खेळाडू आणि टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन पुढच्या आयपीएल मोसमात नव्या संघात दिसू शकतो. काही वृत्तांनुसार, शिखर धवन सनरायझर्स हैदराबादची साथ सोडून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. धवन हैदराबादच्या फ्रँचायझींवर नाराज असल्यामुळे त्याने संघ सोडण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. शिखर धवन 2013 पासून सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. पण अकराव्या मोसमापूर्वी झालेल्या ऑक्शनपूर्वी टीमने त्याला रिटेन केलं नसल्यामुळे तो नाराज आहे. हैदराबादने राईट टू मॅच कार्डचा वापर करुन शिखर धवनला खरेदी केलं होतं. त्याच्यावर 5.2 कोटी रुपयांची बोली लागली होती. शिखर धवनला अत्यंत कमी किंमत मिळाल्यामुळेही तो नाराज असल्याचं बोललं जातं. दुसरीकडे रोहित शर्मा (15 कोटी), महेंद्र सिंह धोनी (15 कोटी) आणि विराट कोहली (17 कोटी) हे सर्वात महागडे खेळाडू ठरले होते. सनरायझर्स हैदराबादच्या अधिकाऱ्याने 'मुंबई मिरर'शी बोलताना सांगितलं, की ट्रेड ऑफच्या माध्यमातून फ्रँचायझींना काही चांगले खेळाडू मिळाले तर हे शक्य आहे. म्हणजेच शिखर धवनच्या मोबदल्यात हैदराबादला काही चांगले खेळाडू मिळाले तर त्याला रिलीज केलं जाईल. मुंबई इंडियन्सनेही ट्रेड ऑफच्या माध्यमातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या क्विंटन डी कॉकला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं आहे. या बदल्यात बांगलादेशचा मुस्ताफिजुर रहमान आणि श्रीलंकेच्या अकिला धनंजयला रिलीज केलं होतं. टीम इंडियाकडून रोहित शर्मासोबत अनेक अविस्मरणीय खेळी करणाऱ्या धवनसाठी मुंबई इंडियन उत्सुक आहेच. शिवाय दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबही शिखर धवनसाठी उत्सुक आहे. आयपीएलच्या बाराव्या मोसमासाठी ऑक्शन डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. ऑक्शनच्या एक आठवडा अगोदर ट्रेड ऑफ विंडो बंद होईल. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएल करिअरची सुरुवात करणाऱ्या शिखर धवनने 2009 मध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं होतं. दोन वर्षानंतर त्याला डेक्कन चार्जरने खरेदी केलं. ही फ्रंचायझी बंद झाल्यानंतर धवन सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget