CWG 2022, Sharath Won Gold : शरथ कमलची 'कमाल', टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाची कमाई, फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूवर विजय
Commonwealth games 2022 : शरथच्या या विजयापूर्वी साथियान गनसेकरन यानेही कांस्य पदक मिळवल्याने टेबल टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत सुवर्ण आणि कांस्य दोन्ही भारताला मिळालं आहे.

CWG 2022 Medal : कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या सुवर्णपदकात आणखी भर पडली आहे. भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू शरथ कमल याने (Sharath Kamal) पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. त्याने इंग्लंडच्या लियाम पीचफोर्ड याला 11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-7 च्या फरकाने पराभूत करत सुवर्ण जिंकले आहे. यापदकासह भारताची पदकसंख्या 60 झाली आहे. भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत 22 सुवर्णपदकं, 15 रौप्यपदक आणि 23 कांस्यपदकं जिंकली आहेत.
#CommonwealthGames2022 | Achanta Sharath Kamal wins Gold in Men's Single Finals in Table Tennis pic.twitter.com/gcThyuYBBQ
— ANI (@ANI) August 8, 2022
कांस्य पदकही भारताला
शरथच्या सामन्यापूर्वी साथियान गनसेकरननं (Sathiyan Gnanasekaran) इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल (Paul Drinkhall) याला 4-3 च्या फरकाने मात देत कांस्य पदक मिळवलं. साथियान आणि पॉल यांच्यातील हा कांस्यपदकासाठीचा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. पण योग्य वेळी आक्रमक खेळ दाखवत साथियाननं आघाडी कायम ठेवली. पण पॉलनंही कडवी झुंज दिल्यानं सामना 3-3 अशा स्थितीत आला होता. पण अखेरच्या राऊंडमध्ये साथियानने आक्रम खेळ दाखवत अगदी रोमहर्षकपणे 11-9 ने विजय मिळवत सामना जिंकला. साथियानने 4-3 (11-9 11-3 11-5 8-11 9-11 10-12 11-9) अशा फरकाने विजय मिळवला.
पुरुष दुहेरीत भारताला रौप्य पदक
टेबल टेनिसमध्ये भारताचा पुरुष दुहेरी संघ अंतिम सामन्यात पराभूत झाल्यमुळे भारताला गोल्ड मिळालं नसलं तरी रौप्यपदक मिळालं आहे. अचंता शरथ कमल आणि साथियान गनसेकरन या जोडीला फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला आहे. अंतिम सामन्यात अचंता आणि साथियान यांनी चांगली झुंज दिली पण इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल आणि लियाम पीचफोर्ड यांनी अधिक दमदार खेळ दाखवत विजय मिळवला. 11-8, 8-11, 3-11, 11-7 आणि 4-11 अशा फरकाने हा सामना त्यांनी जिंकला.
भारतासाठी पदक जिंकलेल्या खेळाडूंची यादी
सुवर्णपदक- 22
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, बॅडमिंटन पुरुष दुहेरी संघ, शरथ कमाल
रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.
कांस्यपदक- 23
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, साथियान गनसेकरन
हे देखील वाचा-























