CWG 2022, Sathiyan Gnanasekaran : भारताला टेबल टेनिसमध्ये कांस्य पदक, साथियान गनसेकरनकडून इंग्लंडच्या पॉलचा पराभव
Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळवलं आहे. भारताच्या साथियान गनसेकरननं इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल याला मात दिली आहे.
CWG 2022 Medal : भारतानं कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) मध्ये आणखी एक पदक मिळवलं आहे. भारतानं टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळवलं आहे. भारताच्या साथियान गनसेकरननं (Sathiyan Gnanasekaran) इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल (Paul Drinkhall) याला 4-3 च्या फरकाने मात दिली आहे. यापदकासह भारताची पदकसंख्या 58 झाली आहे. भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत 20 सुवर्णपदकं, 15 रौप्यपदक आणि 23 कांस्यपदकं जिंकली आहेत.
साथियान आणि पॉल यांच्यातील हा कांस्यपदकासाठीचा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. पण योग्य वेळी आक्रमक खेळ दाखवत साथियाननं आघाडी कायम ठेवली. पण पॉलनंही कडवी झुंज दिल्यानं सामना 3-3 अशा स्थितीत आला होता. पण अखेरच्या राऊंडमध्ये साथियानने आक्रम खेळ दाखवत अगदी रोमहर्षकपणे 11-9 ने विजय मिळवत सामना जिंकला. साथियानने 4-3 (11-9 11-3 11-5 8-11 9-11 10-12 11-9) अशा फरकाने विजय मिळवला.
GOES THE DISTANCE! 🏓@sathiyantt clinches the BRONZE🥉 following a Dramatic victory over Drinkhall of England in the Table Tennis MS Bronze Medal match.
— SAI Media (@Media_SAI) August 8, 2022
Our Indian champ won the match 4-3 (11-9 11-3 11-5 8-11 9-11 10-12 11-9) 🇮🇳
SPECTACULAR SATHIYAN!#Cheer4India pic.twitter.com/SqU5WuWv01
पुरुष दुहेरीत भारताला रौप्य पदक
टेबल टेनिसमध्ये भारताचा पुरुष दुहेरी संघ अंतिम सामन्यात पराभूत झाल्यमुळे भारताला गोल्ड मिळालं नसलं तरी रौप्यपदक मिळालं आहे. अचंता शरथ कमल आणि साथियान गनसेकरन या जोडीला फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला आहे. अंतिम सामन्यात अचंता आणि साथियान यांनी चांगली झुंज दिली पण इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल आणि लियाम पीचफोर्ड यांनी अधिक दमदार खेळ दाखवत विजय मिळवला. 11-8, 8-11, 3-11, 11-7 आणि 4-11 अशा फरकाने हा सामना त्यांनी जिंकला.
भारतासाठी पदक जिंकलेल्या खेळाडूंची यादी
सुवर्णपदक- 20
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन
रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.
कांस्यपदक- 23
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, साथियान गनसेकरन
हे देखील वाचा-