एक्स्प्लोर
पत्नीसोबतच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट, शमीचं सडेतोड उत्तर
मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पत्नीसोबतचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला. शमीने फोटो शेअर केल्यानंतर धार्मिक कट्टरतावाद्यांनी शमीच्या पत्नीने परिधान केलेल्या कपड्यांवर आक्षेप घेत विरोध करायला सुरुवात केली. एकामागोमाग एक अश्लिल आणि आक्षेपार्ह कमेंट करण्यास सुरुवात झाली.
मोहम्मद शमीच्या पत्नीने परिधान केलेले कपडे इस्लामविरोधी आहेत, इस्लामचं पालन करा, लाज बाळगा अशा अनेक कमेंट या फोटोखाली आल्या. त्याचवेळी काही जणांनी या फोटोचं समर्थनही केलं.
मोहम्मद शमीने या 23 डिसेंबरला फोटो फेसबुकवर शेअर केला. त्यानंतर धार्मिक कट्टरातावद्यांकडून विरोधी कमेंट येण्यास सुरुवात झाली. मात्र, शमीने या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. मात्र, टीम इंडियाचा क्रिकेटर मोहम्मद कैफने शमीच्या फोटोचा स्क्रीनशॉट ट्वीट करुन त्याला समर्थन दिलं आणि धर्माच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध केला.
https://twitter.com/MohammadKaif/status/813055964433752064
"देशात आणखी मोठे मुद्दे आहेत. आशा करतो की, कमेंट करणाऱ्यांची समज वाढेल.", अशा शब्दात मोहम्मद कैफने शमीच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना झोडपलं.
मोहम्मद शमीने 23 डिसेंबरला पत्नीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर शमीने आक्षेपार्ह कमेंट्सकडेही दुर्लक्ष केलं. मात्र, आज न राहून शमीने ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया दिली.
https://twitter.com/MdShami11/status/813238737073147905
"हे दोघेही माझं आयुष्य आणि आयुष्याचे सोबती आहेत. मला चांगलं माहित आहे की, काय करायला हवं आणि काय करु नये. आपण स्वत:मध्ये डोकावून पाहिलं पाहिजे की, आपण किती चांगले आहोत.", असं ट्वीट करत आज शमीने आपलं मौन सोडलं आणि टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
विशेष म्हणजे पत्नीसोबतच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी शमीने पत्नी आणि मुलीसोबतचे आणखी काही फोटो फेसबुक, ट्विटरवर शेअर केले. शिवाय, ट्विटर टाईमलाईन फोटोही पत्नी आणि मुलीसोबतचा ठेवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement