Neeraj Chopra : सात वर्षांत 7 सुवर्ण, देशाची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राची गोल्डन कामगिरी
मुंबई : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर नीरज चोप्रा याची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे.
मुंबई : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर नीरज चोप्रा याची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. मागील सात वर्षांमध्ये नीरज चोप्रा याने सात सुवर्णपदकावर नाव कोरलेय. नीरज चोप्रा सध्या भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूमध्ये गणला जातो. नीरज चोप्रा याने अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली. सात वर्षांपासून नीरज चोप्रा याने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. नीरज चोप्रा याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते देशभरातील प्रत्येक नागरिक नीरज चोप्रा याच्या कामगिरीचे कौतुक करत आहे. 2016 मध्ये ज्युनिअर विश्व चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा सर्वात आधी चर्चेत आला होता. त्यानंतर नीरज चोप्रा याच्या नावाची चर्चा सुरुच आहे. त्याने लोकांचा हिरमोडही केला नाही.
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या इतर खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. पण नीरज चोप्रा याने आपेक्षेप्रमाणे भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. स्पर्धेच्या सुरुवात झाल्यापासूनच नीरज चोप्राकडून सर्वांनाच पदकाची आपेक्षा होती, त्याने ती पूर्ण केली.
नीरज चोप्राचा जन्म सर्व सामान्य कुटुंबात झाला होता. फिटनेससाठी नीरज चोप्रा याने भालाफेक करण्यास सुरुवात केली होती. भालाफेकमध्ये त्याचे सातत्य पाहून त्याला यातच करिअर करण्याचा सल्ला देण्यात आला. नीरज चोप्रा याने विविध स्पर्धेत भाग घेऊन देशाची मान उंचावली आहे. सर्वात आधी 2016 मध्ये नीरज चोप्रा याने दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. 2017 मध्ये आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेतही सुवर्णपदकावर नाव कोरले. 2018 मध्ये आशिएन गेम्ससोबत राष्टमंडल खेळातही सुवर्णपदक पटकावले. आतापर्यंत नीरज चोप्रा याने सात सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. 2020 मध्ये नीरज चोप्रा याने ऑळम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्यानंतर लहानांपासून थोरामोठ्यापर्यंत सर्वजण नीरज चोप्रा याचे फॅन झाले. 2022 मध्ये डायमंड स्पर्धेतही नीरज याने सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्रा याने 89.94 मीटर इतका दूर भालाफेक करत रेकॉर्ड केला. पण तो इतक्यावरच थांबला नाही, त्याला 90 मीटरपेक्षा दूर भाला फेकायचा आहे.
नीरज चोप्राची सर्वोत्कृष्ट कामगिरी -
स्टॉकहोम डायमंड लीग 2022
स्वीडन येथे डायमंड लीग 2022 स्पर्धेत नीरज चोप्रा याने 89.94 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. त्यासोबत त्याने फिनलँडमध्ये पावो नुरमी गेम्समध्ये केलेला स्वत:चा विक्रम मोडीत काढला. फिनलँडमध्ये नीरज चोप्रा याने 89.30 मीटर दूर भाला फेक केली होती.
दोहा डायमंड लीग, 2023
नीरज याने 88.67 इतका दूर भालाफेक करत 2023 मध्ये दोहा डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. पहिल्याच प्रयत्नात नीरज याने सुवर्ण जिंकले होते.
विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, 2022
2022 मध्ये झालेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरज चोप्रा याने रौप्य पदकावर नाव कोरले. या स्पर्धेत रजत पदक जिंकणारा नीरज एकमेव खेळाडू होता. नीरज चोप्रा याने 88.13 मीटर दूर भालाफेक करत इतिहास रचला होता.
आशियाई स्पर्धा, 2018
नीरज चोप्रा याने 2018 मध्ये आशियाई स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले होते. त्याने 88.06 मीटर भालाफेक केली होती.
लुसान डायमंड लीग, 2023
नीरज याने 87.66 मीटर भाला थ्रो करत अव्वल स्थान पटकावले होते. पाचव्या प्रयत्नात नीरज चोप्रा याने सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
टोक्यो ऑलम्पिक, 2020
2020 मध्ये झालेल्या टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा याने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. 87.58 मीटर थ्रो करत नीरज चोप्रा याने भारतासाठी गोल्ड जिंकले होते.
विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023
88.17 मीटरचा थ्रो करत नीरज चोप्रा याने गोल्डवर नाव कोरलेय. या दमदार कामगिरीसह नीरज चोप्राला पॅरिस ऑल्मिपकचे तिकिटही मिळालेय. विश्व अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदकावर नाव कोरणारा नीरज एकमेव भारतीय खेळाडू ठरलाय.