(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Serena Williams Retirement : टेनिसक्वीन सेरेना विल्यम्सने निवृत्तींच्या अफवांवर लावला पूर्णविराम, म्हणाली...
Serena Williams : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरकित्येक काळ वर्चस्व गाजवणारी सेरेना विल्यम्सच्या (Serena Williams) निवृत्तीच्या चर्चा मागील बऱ्याच काळापासून येत होत्या...
Serena Williams : टेनिस विश्वातील अव्वल दर्जाची महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) तिच्या टेनिस कारकीर्दीला अलविदा करुन निवृत्त होणार अशा अनेक चर्चा मागील काही काळापासून रंगल्या होत्या. पण आता तिने स्वत:च तिच्या निवृत्तीबद्दल (Serena Williams Retirement) महत्त्वाची माहिती देत लवकरच टेनिस कोर्टावर पुनरागमनाचे संकेत देखील दिले आहेत.
सेरेना विल्यम्सने सॅन फ्रान्सिस्को येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, 'मी निवृत्ती घेतलेली नाही. माझ्या नक्कीच पुनरागमन करेल. तुम्ही माझ्या घरी येऊन पाहू शकता. माझ्या घरातच टेनिस कोर्ट आहे. यूएस ओपननंतर सेरेना सध्या अन्य कोणत्याही स्पर्धेसाठी तयारी करत नाहीये, ज्यावर बोलताना ती म्हणाली, 'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं होत आहे की मी सध्या कोणत्याही टूर्नामेंटसाठी खेळत नाहीये. हे खूप विचित्र वाटत आहे पण मी निवृत्तीबद्दल अजूनतरी काहीही विचार केलेला नाही.
याआधी 2022 मध्येच टेनिसमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. वॉग्यू (Vogue) या प्रसिद्ध ब्रँडसाठी नुकत्याच तिने केलेल्या एका फोटोशूटचे फोटो अधिकृत इन्स्टाग्रामवर (Serena Williams Instagram Post) पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमधून सेरेनाने निवृत्तीचे संकेत दिले होते. सेरेनाने पोस्ट केलेल्या फोटोत तिने लिहिले आहे की, “आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करता तेव्हा तो काळ नेहमीच कठीण असतो. माझ्या चांगुलपणाने मी टेनिसचा आनंद घेतो. मात्र, आता काऊंटडाऊन सुरु झालं आहे. मला एक आई म्हणून आता जगायचं आहे.'' दरम्यान सेरेनाने आई म्हणून जगण्यावर अधिक लक्ष द्यायचं या पोस्टमध्ये लिहिलं असल्याने ती लवकरच खेळातून निवृत्त होईल असा चर्चांना उधान आलं होतं.
23 ग्रँडस्लॅमची विजेती आहे सेरेना
सेरेना विल्यम्सची (Serena Williams career) गणना टेनिस जगतातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 23 ग्रँडस्लॅम (GrandSlam) जेतेपदे जिंकली. सेरेनाने 1995 मध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. गेली 27 वर्षे ती सतत टेनिस खेळत आहे. खुल्या युगात, महिला आणि पुरुषांमध्ये सर्वाधिक एकेरी ग्रँडस्लॅम जिंकणारी ती टेनिसपटू आहे.
हे देखील वाचा-
T20 World Cup 2022 : 'तुझ्यामुळे मी वाचलो', दिनेश कार्तिक अश्विनला असं का म्हणाला?