एक्स्प्लोर
राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : राहुल आवारेसह महाराष्ट्राची पदकांची लयलूट
राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी पदकांची लयलूट करत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. दोन सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राने 6 पदके जिंकली आहेत.
लखनौ : रविवारी रात्री उत्तर प्रदेशमधील गोंडा या शहरात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी पदकांची लयलूट करत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अमित धानकरने 74 किलो वजनी गटात पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले. तर राहुल आवारे याने वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग सातवे सुवर्णपदक पटकावले.
राहुल आणि अमितने सुवर्णपदक पटकावल्यानंतर 125 किलो वजनी गटात पैलवान अभिजीत कटके याने रौप्यपदकाची कमाई केली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत महाराष्ट्राच्या पैलवानांनी पाच पदके जिंकून आपल्या शिरपेचात मानाचे तुरे खोवले. त्यात सिकंदर शेख याने सुवर्ण, अभिजीत कटके आणि कौतुक डाफळे याने रौप्य तर नामदेव कोकाटे याने कांस्यपदकाची कमाई केली.
राहुल आवारे याने ६१ किलो वजनी गटाच्या विजेतेपदासाठी गोव्याच्या अभिमन्यू यादवला धूळ चारत राष्ट्रीय कुस्तीतले सातवे सुवर्णपदक स्वतःच्या नावावर केला. सांघिक कामगिरीत रेल्वेच्या संघाने १६३ गुणांसह बाजी मारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement