एक्स्प्लोर

Saumy Pandey in the U-19 World Cup 2024 : नावात 'सौम्य' पण अंडर 19 वर्ल्डकपमध्ये फिरकीने धडकी भरवत इतिहास घडवला; टीम इंडियासाठी दरवाजा ठोठावला!

सौम्य पांडेनं स्पर्धेतील 18 वी विकेट ठरली. त्याने एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेत इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या U-19 वर्ल्डकपच्या इतिहासात 18 विकेट घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

Saumy Pandey in the U-19 World Cup 2024 : अंडर 19 वर्ल्डकप सहव्यांदा पटकावण्यासाठी टीम  इंडिया सज्ज आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून गोलंदाजांन सर्वोत्तम कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला रोखले. राज लिंबानीने तीन विकेट घेतल्या, तर नमन तिवारीने दोन विकेट घेतली.  सौम्य पांडे आणि मुशीर खानने प्रत्येकी एक विकेट घेतली. सौम्य पांडेनं घेतलेली विकेट ही स्पर्धेतील 18 वी विकेट ठरली. त्याने एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेत इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या U-19 वर्ल्डकपच्या इतिहासात 18 विकेट घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

दरम्यान, टीम इंडियाकडून उदय सहारन, सौम्य पांडे आणि मुशीर खान यांना अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. सौम्य पांडेनं स्पर्धेत भारताच्या प्रभावी कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

वयाच्या एक वर्षापासून क्रिकेटवर प्रेम

सौम्य पांडे ही विंध्य भागातील सिधी जिल्ह्यातील भरतपूर गावचा आहे. सौम्यचे पांडेचे आई-वडील शिक्षक आहेत. सौम्यचे वडिल केके पांडे सांगतात, "जेव्हा सौम्य फक्त एक वर्षाची होता, तेव्हा तो बेडवर प्लास्टिकचा चेंडू आणि बॅट घेऊन झोपायचा. हळुहळू तो बोलायला शिकला आणि क्रिकेट सोडून इतर काही चर्चा झाली तर त्याला राग यायचा. क्रिकेटवर त्याचं प्रेम इतकं होतं की त्याशिवाय त्याला दुसरं काही आवडत नव्हतं.

गुरुजी तू डॉक्टर होणार म्हटल्यावर सौम्य रडायला लागला 

पांडे सांगतात, "एकदा तो आपल्या कुटुंबासह गुरु महाराजांच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी सौम्य अवघ्या तीन ते चार वर्षांची होता. तो त्याच आश्रमात राहत होता. महाराजांचा एक शिष्य त्यांना तिथे भेटला तेव्हा त्यांनी सौम्यला महाराजांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेण्यास सांगितले. तर त्यांनी आशीर्वाद दिला की तो इंजिनियर किंवा डॉक्टर बनेल, तेव्हा सौम्य रडायला लागला आणि म्हणाला की मला काहीही बनायचं नाही, मला फक्त क्रिकेटर बनायचं आहे. यानंतर गुरु महाराज त्याला आपल्या मांडीवर घेतात आणि शांत करतात आणि म्हणतात की तू क्रिकेटर होशील.'' या घटनेचा उल्लेख करून त्याचे वडील हसायला लागतात आणि म्हणतात की आज माझा मुलगा क्रिकेटर झाला आहे.

सौम्यचे वडील म्हणतात, "ते रीवामध्ये भाड्याने राहू लागले. त्याठिकाणी क्रीडा उपक्रमांसाठी जागा नव्हती, म्हणून त्यांनी आपल्या मुलांना क्रिकेट अकादमीत पाठवले. आज तो अंडर 19 वर्ल्ड कप खेळत आहे. केके पांडे पुढे म्हणाले की, जेव्हा सौम्यने अंडर 16 मध्ये सेंट्रल झोन मॅचमध्ये 36 विकेट घेतल्या होत्या आणि राष्ट्रीय स्तरावर विकेट्स घेण्यात तो तिसऱ्या क्रमांकावर होती. मग त्यांच्या मनात थोडी आशा निर्माण झाली आणि तेव्हापासून सौम्यला त्याच्या अभ्यासाचा त्रास देणे बंद केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून  धक्काबुक्कीChhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?ABP Majha Headlines :  10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Embed widget