एक्स्प्लोर
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षांचा राजीनामा
संदीपआप्पा भोंडवे यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या कुस्तीत आदराची भावना आहे. ते स्वत: राष्ट्रीय दर्जाचे पैलवान आहेत. त्यामुळे कुस्तीतल्या नियमांची त्यांना चांगली जाण आहे.
मुंबई : पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धा समिती अध्यक्षपदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कारभारावर नाराज होऊन भोंडवे यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं.
महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रातली प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती अवघ्या महिन्यावर आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या भुगावमध्ये 13 ते 17 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र केसरीचं आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भोंडवे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीत खळबळ निर्माण झाली आहे.
संदीपआप्पा भोंडवे यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या कुस्तीत आदराची भावना आहे. ते स्वत: राष्ट्रीय दर्जाचे पैलवान आहेत. त्यामुळे कुस्तीतल्या नियमांची त्यांना चांगली जाण आहे. महाराष्ट्र केसरीसारख्या मोठ्या कुस्ती स्पर्धेच्या कालावधीत आखाड्याजवळ खंबीरपणे उभं राहून वाद मिटवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो.
त्यामुळे भोंडवे यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या कुस्तीच्या दृष्टीने धक्कादायक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement