एक्स्प्लोर
फिफा विश्वचषक : सेमीफायनलसाठी सचिनचा इंग्लंडच्या संघाला पाठिंबा
बाद फेरीतील दुसऱ्या सेमीफायनमध्ये आज इंग्लंड आणि क्रोएशिया हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर मास्टर ब्लास्टर सचिनने इंग्लंडच्या संघाला शुभेच्छा देणारा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
मुंबई : रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाने जगभरातील फुटबॉल चाहत्यांना वेड लावलं आहे. त्यातच आता बाद फेरीतील सामन्यांमुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरनेही आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देणारा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
बाद फेरीतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आज इंग्लंड आणि क्रोएशिया हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर मास्टर ब्लास्टर सचिनने इंग्लंडच्या संघाला शुभेच्छा देणारा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडीओत ‘कम ऑन इंग्लंड’ असं म्हणत सचिन आपलं फुटबॉल स्किलही दाखवताना दिसत आहे.
आपल्या संपुर्ण कुटुंबाला सर्वच खेळांची प्रचंड आवड आहे, असं सचिनने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटलं होतं. दरम्यान, यंदाच्या फिफा विश्वचषकात इंग्लंडचा संघ बाद फेरी गाठेन असं फुटबॉलच्या जाणकारांना वाटत नव्हतं. पण इंग्लंडने दमदार कामगिरी करत सेमीफायनमध्ये धडक मारली आहे. क्रोएशियाविरुद्धची आजची मॅच जिंकल्यास इंग्लंडचा फायनलमधील प्रवेश निश्चित होईल. याअगोदर झालेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये फ्रान्सने बेल्जियमचा पराभव करत फायनल गाठली आहे.Come on England!! #FIFA18@JamosFoundation pic.twitter.com/S9PZ9EWQHk
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 11, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement