RR vs KXIP : क्रिस गेल आणि जोस बटलर संघात परतण्याची शक्यता; कोण बसणार संघाबाहेर?
RR vs KXIP Live Score Updates : आयपीएल 2020 स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये सामना रंगणार आहे. या मॅचमध्ये जोस बटलर आणि क्रिस गेल संघात परतण्याची शक्यता आहे.
RR vs KXIP IPL 2020 : आयपीएल 2020 स्पर्धेतील आज 9 सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता शारजाहमध्ये खेळवला जाणार आहे. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी जोस बटलर आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये क्रिस गेल संघात येण्याची शक्यता आहे. या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत यंदाच्या सीजनमध्ये एकही सामना खेळलेला नाही.
क्वॉरंटाईनच्या नियमांमुळे बटलर चेन्नई विरोधात राजस्थानकडून खेळू शकला नाही. तर गेल देखील दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरोधात खेळण्याची संधी मिळाली नाही.
आजच्या सामन्यात हे दोन स्फोटक फलंदाज त्यांच्या संघातील प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकतात. मात्र, या दोन्ही खेळाडूंना संधी मिळाल्यास कोणता खेळाडू बसरणार, हा मोठा प्रश्न आहे. जर आज बटलरला राजस्थानमध्ये संधी मिळाली तर डेव्हिड मिलर खाली बसावे लागेल. दुसरीकडे, गेल पंजाब संघात पुनरागमन करत असेल तर निकोलस पूरण, ग्लेन मॅक्सवेल आणि जेम्स नीशम या दोघांपैकी एकाला खाली बसावं लागणार आहे. अशा परिस्थितीत आज दोन्ही कर्णधारांसाठी अकरा खेळाडूंची निवड डोकेदुखी ठरू शकते.
मॅचमध्ये होणार काट्याची टक्कर
शारजाह येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळेल. कारण, जर राजस्थान संघात स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल सारखे खेळाडू असतील तर पंजाबमध्येही ग्लेन मॅक्सवेल, केएल राहुल, निकोलस पूरन आणि ख्रिस गिलसारखे महान खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत ही मॅच तोलामोलाची नक्कीच होणार.