Road Safety Series Finale LIVE | अंतिम सामन्यात India Legends कडून श्रीलंका लेजेंड्सचा पराभव
तिलकरत्न दिलशान याच्या संघानं म्हणजेच श्रीलंका लेजेंड्स या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला.
Road Safety Series Finale LIVE मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या इंडिया लेजेंड्स या संघानं तिलकरत्न दिलशान याच्या श्रीलंका लेजेंड्स या संघाचा Road Safety Series Finale मध्ये 14 धावांनी पराभव केला. Road Safety Series च्या पहिल्याच पर्वात रायपूरमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी मैदान गाजवलं.
तिलकरत्न दिलशान याच्या संघानं म्हणजेच श्रीलंका लेजेंड्स या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर भारतीय संघानं प्रथम फलंदाजीसाठी येत 20 षटकांमध्ये 4 बाद 181 धावा केल्या. भारतीय संघाचं हे आव्हान पेलताना मैदानात आलेला श्रीलंकेचा संघ 7 गडी बाद 167 धावांवर गारद झाला आणि सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वात मैदानात आलेल्या इंडिया लेजेंड्स या संघानं ही स्पर्धा जिंकली.
युवराज सिंह आणि युसूफ पठान या दोन्ही खेळाडूंनी क्रीडारसिकांना गतकाळाची सफर घडवली. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी रचली. युवराज सिंह यानं 41 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या. यामध्ये त्यानं 4 षटकार आणि चौकारांचीही बरसात केली.
#INDLvsSLL
— Road Safety World Series (@RSWorldSeries) March 21, 2021
🏆 We have our first champions of the @Unacademy Road Safety World Series, an intense final sees the #IndiaLegends come out on top after a close contest against the indomitable #SriLankaLegends. pic.twitter.com/96Fo51pXcA
युवराज तंबूत परतल्यानंतर इरफान पठान यानं युसूफ पठानची साथ देत 36 चेंडूंमध्ये बिनबाद 62 धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांची बरसात केली. तर, वेस्ट इंडिज लेजेंड्स या संघाविरोधात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सचिन तेंडुलकरला मात्र या सामन्यात 30 धावांनंतरच माघारी परतावं लागलं.