Ritika Phogat | 'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या, कुस्तीत केवळ एका गुणाने पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल
कुस्तीच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणाने पराभव झाल्याने रितिका फोगाटने (Ritika Phogat ) आत्महत्या केली आहे.
Ritika Phogat : दंगल गर्ल गीता फोगट आणि बबीता फोगाटची मामेबहीण असलेल्या रितिका फोगाटने आत्महत्या केली आहे. राज्यस्तरीय कुस्तीच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणाने झालेला पराभव सहन करता न आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येने कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे. कुस्ती क्षेत्रात फोगाट कुटुंबाने नाव कमावलं आहे. रितिकाच्या आत्महत्येने त्यांना मोठा धक्का बसल्याचं सांगण्यात येतंय.
गीता आणि बबीता या स्टार कुस्तीपटूंची मामेबहीण असलेल्या 17 वर्षीय रितिकालाही फोगाट बहिणींप्रमाणे कुस्तीपटू बनायचं होतं. त्यासाठी ती गेली 5 वर्षे तिचे मामा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांच्या अकादमीमध्ये सराव करत होती. तिने नुकतंच भरतपूरमधील लोहागढ स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्थरीय सब-ज्यूनियर आणि ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव तिच्या जिव्हारी लागला आणि तो सहन न झाल्याने तिने सोमवारी रात्री खोलीतील पंख्याला ओढणी बांधून फाशी घेतली.
रितिकाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केला. रितिकाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार तिच्या गावी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूरमध्ये करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :