एक्स्प्लोर
पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या मरियप्पनचा दानशूरपणा
चेन्नई : रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या मरियप्पन थांगावेलूनं आपल्या दिलदारपणानंही समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. थांगावेलूनं त्याला मिळालेल्या इनामाच्या रकमेतून तब्बल 30 लाख रुपयांची देणगी आपल्या सरकारी शाळेला दिली आहे.
मरियप्पन थांगावेलू हा मूळचा तामिळनाडूचा असून, रिओ पॅरालिम्पिकमध्ये त्यानं उंच उडीत सुवर्णपदक पटकावलं. पॅरालिम्पिकच्या इतिहासात सुवर्णपदकाची कमाई करणारा थांगावेलू हा तिसरा भारतीय ठरला. या कामगिरीसाठी थांगावेलूला तामिळनाडू सरकारकडून दोन कोटी आणि केंद्रीय क्रीडा खात्याकडून 75 लाख रुपयांचं इनाम जाहीर झालं आहे.
थांगावेलूनं त्या रकमेपैकी 30 लाख रुपयांची देणगी आपल्या सरकारी शाळेला दान करण्याचं जाहीर केलं आहे. मरियप्पन थांगावेलूला पॅरालिम्पिकच्या सांगता सोहळ्यात भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाचा मान देण्यात आला आहे. सांगता सोहळ्यातल्या संचलनात तो भारतीय पथकाचं नेतृत्त्व करताना दिसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement