एक्स्प्लोर
डीके जैन बीसीसीआयचे पहिले लोकपाल, पंड्या-राहुल यांच्या प्रकरणावर चौकशी करणार
जस्टीस बोबडे आणि जस्टीस सप्रे यांच्या खंडपीठाने जैन यांच्या नेमणुकीचे आदेश दिले. या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षकारांनी जैन यांच्या नावाला समंती दर्शवल्यामुळे न्यायालयाने जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारच्या लोकपाल मंडळाच्या मंडळाविषयी पहिली मोठी घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश डीके जैन यांची बीसीसीआयच्या लोकपाल पदी नियुक्ती केली आहे. डीके जैन हे बीसीसीआयचे पहिले लोकपाल ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं लोढा समितीच्या शिफारशींप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ही नियुक्ती केली. बीसीसीआयमधल्या प्रशासकीय सुधारणांसाठी लोढा समितीनं केलेल्या शिफारशीत लोकपालच्या नियुक्तीचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे पहिले लोकपाल नेमल्यामुळे आता हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमातील महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बीसीसीआयच्या प्रशासकिय कमिटीने लोकपालची मागणी केली होती. त्यामुळे आता हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या वक्तव्याप्रकरणी डीके जैन पुढील चौकशी करतील.
जस्टीस बोबडे आणि जस्टीस सप्रे यांच्या खंडपीठाने जैन यांच्या नेमणुकीचे आदेश दिले. या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षकारांनी जैन यांच्या नावाला समंती दर्शवल्यामुळे न्यायालयाने जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. याचसोबत जैन यांनी तात्काळ पदाचा ताबा घ्यावा असे निर्देशनही न्यायालयाने दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं.
आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं.
यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. या टिप्पणीनंतर सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची शाळा घेतली. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बुधवारी एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली. "कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे जे दुखावले किंवा ज्यांना अपमान झाल्याचं वाटलं त्या सगळ्यांची माफी मागतो. मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. सन्मान"
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement