Reliance to support Indian athletes : रिलायन्स फाऊंडेशनची अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियासोबत भागीदारी
Reliance to support Indian athletes : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अॅथलेटिक्स फेडरेश ऑफ इंडिया यांच्यामध्ये भागिदारी झाली आहे.
Reliance to support Indian athletes : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अॅथलेटिक्स फेडरेश ऑफ इंडिया यांच्यामध्ये भागिदारी झाली आहे. भारतातील अॅथलेटिक्सच्या सर्वांगीण वृद्धीसक्षमतेकरिता या भागिदारीची घोषणा करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून रिलायनस् फाऊंडेशन अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियासाठी भागीदार म्हणून काम करतेय. 'जागतिक खेळातूल सर्वात लोकप्रिय शाखांपैकी एक अशी अॅथलेटिक्सची शाखा आहे आणि या एएफआय संघटनेचा उद्देश हा मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करुन येथील तरुणांना अधिक संधी आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देऊन अॅथलेटिक्सच्या वाढीला गती देणे हा आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक नीता अंबानी म्हणाल्या.'
तरुणांना संधी मिळावी तसंच मुलींवर विशेष लक्ष केंद्रित व्हावं म्हणून जागतिक दर्जाच्या सुविधा देऊन भारतीय ऍथेलेटिक्सच्या वाढीला गती मिळावी हा या एएफआय संघटनेचा उद्देश आहे.
रिलायन्स फाऊंडेशन लिमिटेड (RIL) आणि ऍथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या भागादिराची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
1. देशातील भारतीय ऍथलीट्सची निवड करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांच्या खेळाचा विकास हे या भागीदारीचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर, या खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा, प्रशिक्षण आणि क्रीडा- विज्ञान आणि वैद्यकीय साहाय्य करणं हे ओडिशा रिलायन्स फाऊंडेशन अॅथलेटिक्स हाय-परफॉर्मन्स सेंटर आणि सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल यांच्यासोबतच रिलायन्स फाऊंडेशनच्या एकात्मकतेचा लाभ आहे.
2. या भागीदारीमध्ये महिला खेळांडूंवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. लिंगभेद दूर करुण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिक सक्षम बनवणं हा यामागचा हेतू आहे.
3. एएफआयचे मुख्य भागीदार म्हणून रिलायन्स नाममुद्रा प्रमुख राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरांमधील राष्ट्रीय संघांच्या जर्सीवर व प्रशिक्षण किटमध्ये दिसून येईल.
रिलायन्स फाऊंडेशनने 2017 पासून रिलायन्स फाऊंडेशन युवा क्रीडा उपक्रमाद्वारे अॅथलेटिक्स विकासार्थ योगदान दिले आहे. त्यामुळे देशभरातील 50 हून अधिक जिल्ह्यांतील पाच हजार 500 हून अधिक शौक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचता आलेय. रिलायन्स फाऊंडेशनने 2018 मध्ये ओडिशा सरकारच्या भागीदारीबरोबर ओडिशा रिलायन्स फाऊंडेशन अॅथलेटिक्स एचपीसी हे एक उच्च कार्यक्षमता केंद्र स्थापन केले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते आणि राष्ट्रीय विक्रमधारक येथून उदयास आले आहेत. अलीकडेत एचपीसीमधील ज्योजी यारराजी (सध्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतेय) आणि अमलान बोरगोहाई यांनी अनेक राष्ट्रीय विक्रम मोडले.