एक्स्प्लोर

RCB vs SRH IPL 2021 Match Preview : चेन्नईमध्ये हैदराबाद आणि बंगळूरू एकमेकांशी भिडणार

बंगळूरुने पहिल्या सामन्यात मुंबईविरूद्धच्या विजयासह मोहीम सुरू केली. त्याचवेळी हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाताच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले.

IPL 2021 : आज आयपीएलमध्ये हैदराबाद आणि बंगळूरु हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. संध्याकाळी 7.30  वाजता चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. आरसीबीने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरूद्धच्या विजयासह मोहीम सुरू केली. त्याचवेळी हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाताच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले.

बंगळूरुच्या या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांची नजर मागील सामन्यातील हिरो हर्षल पटेलकडे असणार आहे. त्याने पाच बळी घेतले.या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडून जबरदस्त कामगिरीची अपेक्षा असेल. आकडेवारीबद्दल बोलताना सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये खेळलेल्या सामन्यांमध्ये 10 आणि आरसीबी 7 सामने जिंकले आहेत.

चेन्नईची ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. ज्यामध्ये रशीद खान आणि मोहम्मद नबी हा सामना हैदराबादच्या बाजूने वळवू शकतात. हैदराबादच्या तुलनेत आरसीबीचा स्पिन विभाग या सामन्यात कमकुवत दिसत आहे.

हैदराबादकडून वॉर्नरने बंगळूरुविरूद्ध सर्वाधिक 593 धावा केल्या आहेत. बंगळूरुकडून हाच विक्रम संघाच्या कर्णधार कोहलीच्या नावावर आहे ज्याने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 531 धावा केल्या आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर भुवनेश्वरकुमार हा बंगळूरु विरुद्ध हैदराबादचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने कोहलीच्या संघाविरुद्ध 14 बळी घेतले आहेत. त्याचवेळी, हैदराबादच्या जास्तीत जास्त 16 फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविणारा लेगस्पिनर युजवेंद्र चहलकडून पुन्हा एकदा बंगळूरु संघाला बरीच आशा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget