एक्स्प्लोर
... म्हणून विराट कोहलीने ऑरेंज कॅप नाकारली!
चालू मोसमात सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर आहेत, त्याला ऑरेंज कॅपचा मान मिळतो. मात्र हा मान मिळूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने ऑरेंज कॅप नाकारली.
मुंबई : आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवणं हे प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं. चालू मोसमात सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर आहेत, त्याला ऑरेंज कॅपचा मान मिळतो. मात्र हा मान मिळूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने ऑरेंज कॅप नाकारली.
विराटच्या नाराजीचं कारण हे आपल्या संघाने केलेलं सुमार प्रदर्शन होतं. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेल्यामुळे बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे विराट निराश झाला आणि त्याने ऑरेंज कॅपचा मान स्वीकारला नाही.
वानखेडेवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सलामीला आलेल्या विराट कोहलीने एकाकी झुंद देत नाबाद 92 धावांची खेळी केली. मात्र आरसीबीचा 46 धावांनी पराभव झाला. कारण, विराटला साथ देण्यासाठी एकही फलंदाज खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही.
आपल्या नाराजीचं कारण विराट कोहलीने सामन्यानंतर जाहीरपणे सांगितलं. ''मुंबई इंडियन्सने दिलेलं आव्हान पार करणं शक्य होतं. मात्र आम्ही हाताने पराभव ओढून घेतला,'' असं विराट म्हणाला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराटच्या नावावर
दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल येण्याचा मानही मिळवला. सुरेश रैनाला मागे टाकत त्याने आयपीएलमध्ये 6 हजार 619 धावांचा टप्पा पूर्ण केला. सुरेश रैनाच्या नावावर 4 हजार 558 धावा जमा आहेत.
संबंधित बातम्या :
हार्दिक पंड्याचा थ्रो, ईशान किशनला गंभीर दुखापत
कोहलीचा धावांचा डोंगर, रैनाचा विक्रम मोडला!
कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ, मुंबईचा मोठा विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement