एक्स्प्लोर

Ravindra Jadeja: टीम इंडियाला मोठा धक्का! रवींद्र जाडेजा टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता

T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय.

T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) टी-20 विश्वचषकाला मुकण्याची शक्यता आहे. आशिया चषक 2022 स्पर्धेदरम्यान रविंद्र जाडेजाच्या गुघड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघात परत येऊ शकला नाही आणि आशिया चषक 2022 स्पर्धेतून बाहेर पडला. जाडेजा हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याचं विश्वचषकातून बाहेर पडणं भारतीय संघासाठी मोठा धक्का असेल.

आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात जाडेजाची सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात जाडेजानं पाकिस्तानविरुद्ध 29 चेंडूत 35 धावांची महत्वाची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. परंतु, स्पर्धेदरम्यान रविंद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला. आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट्स समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये एका एडव्हेंचर अॅक्टिविटी करत असताना जडेजाला दुखापत झाली.  टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे जाडेजाला एका वॉटर बेस्ट ट्रेनिंग अॅक्टिव्हिटीत सामील होण्यास सांगितलं गेलं. हॉटेलच्या आवारात असलेल्या बॅकवॉटर फॅसिलिटीत ही अॅक्टिव्हिटी करण्यात आली. जाडेजाला स्की बोर्डवर स्वत:ला पाण्यात बॅलेंस करायचं होतं. ही एक ए़डव्हेंचर अॅक्टिव्हिटी होती आणि बीसीसीआयच्या ट्रेनिंगचा मॅन्युअल भाग नव्हता. याच अॅक्टिव्हिटी दरम्यान रविंद्र जाडेजाचा पाय घसरला आणि त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. 

2022 पासून रवींद्र जाडेजाचा फॉर्म
सध्या रविंद्र जाडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्यानं यावर्षी 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. ज्यात 50.25 च्या सरासरीनं 201 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 141.54 इतका होता. तर, गोलंदाजीत जाडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याला फक्त 5 विकेट्स घेता आल्या आहेत. 

दुखापतीमुळं वेस्ट इंडीज दौऱ्यातून मुकावं लागलं
आशिया चषकापूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातही रविंद्र जाडेजा भारतीय संघाचा भाग नव्हता. उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळं त्याला निवड समितीनं विश्रांती दिल्याचं सांगण्यात आलं होतं.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget