एक्स्प्लोर

Rashid Khan : राशिद खानच्या नावे नवा विक्रम; 2022 वर्षात केली ही भन्नाट कामगिरी

Rashid Khan Most wickets in T20s in 2022: राशीदनं शानदार गोलंदाजी करताना चार विकेट्स घेतल्या. या विकेट्ससह तो 2022 या वर्षात टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.

Rashid Khan Most wickets in T20s in 2022: कालच्या सामन्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात राशिद खानच्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव केला. माफक 144 धावांचा बचाव करताना गुजरातच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. या नवव्या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने यंदा जबरदस्त कामगिरी केली आहे. गुजरातने 12 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 18 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातचे फक्त तीन पराभव झाले आहेत. आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ ठरला आहे. 

हा सामना खऱ्या अर्थान फिरवला तो राशिद खाननं. राशिदनं शानदार गोलंदाजी करताना चार विकेट्स घेतल्या. या विकेट्ससह तो 2022 या वर्षात टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.  त्यानं संदिप लामिछानेचा विक्रम मोडला आहे. राशिदने 3.5 षटकात 24 धावा देत चार गड्यांना बाद केले.  
 
संदीप लामिछानेचा विक्रम मोडीत 
कालच्या सामन्यात राशिदने 3.5 षटकात 24 धावा देत चार विकेट्स घेतल्या. त्यानं दीपक हुड्डाला 27 धावांवर, क्रुणाल पांड्याला पाच तर जेसन होल्डर 1 धावेवर तर आवेश खानला 12 धावांवर बाद केलं. 2022 सालामध्ये  टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्यानं केला आहे. त्यानं संदिप लामिछानेचा विक्रम मोडला आहे. राशिदनं यंदा 27 सामने खेळले आहेत, त्यात त्यानं 40 विकेट्स घेतल्यात. तर संदिपनं 23 सामन्यात 38 विकेट्स घेतल्या आहेत. या लिस्टमध्ये ड्वेन ब्रावो तिसऱ्या नंबरवर आहे. त्यानं 19 सामन्यात 34 विकेट्स घेतल्या आहेत. राशिद खाननं केवळ गोलंदाजीतच नाही तर फलंदाजीनं देखील आपल्या संघाला काही विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.   

2022 सालात टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज 

राशिद खान: 27 मॅच, 40 विकेट
संदीप लामिछाने: 23 मॅच, 38 विकेट
ड्वेन ब्रावो: 19 मॅच, 34 विकेट
जेसन होल्डर: 17 मॅच, 29 विकेट

महत्त्वाच्या बातम्या

Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget